नवी दिल्ली दि. २९ मे
पुणे येथील सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या मागितल्या होत्या आणि संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी या मागण्या मध्ये होती. राज ठाकरे यांनी केलेली मागणी पूर्ण होणार असंच केंद्र सरकारच्या एका निर्णयावरून दिसून येत आहे.
केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यासाठी एक समिती नेमली असून ही समिती संरक्षण करणार आहे. केंद्र सरकारने हा निर्णय घेऊन संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने एक पाऊल पुढे टाकल्याचं दिसून येत आहे.
त्याची सुरुवात उत्तराखंडमधून होत असल्याचंही राजकीय सूत्रांनी सांगितलं. उत्तराखंडमध्ये सर्व्हे झाल्यावर त्यातून जो निष्कर्ष निघेल त्यावरून संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे