अहमदनगर दि.७ ऑक्टोबर
संरक्षण विभागाची बनावट एनओसी प्रकरण चांगलेच रंगात आले असून नगरच्या उपविभागीय कार्यालयाने अडीच वर्षानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात लोकांविरुद्ध संरक्षण विभागाची बांधकामासाठी लागणारी बनावट एनओसी सादर केली असल्याची फिर्याद दिल्यानंतर या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत असतानाच तपासामध्ये पोलिसांना थेट संरक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आढळून आल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर त्याचा दुसरा साथीदारही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. ही साखळी हळूहळू वाढत जाणार होती त्या दृष्टीने पोलीस तपास योग्य रीतीने सुरू असतानाच अचानकपणे कोतवाली पोलिसांकडून हा तपास उपविभागीय उपाधीक्षकांकडे सोपवण्यात आल्यामुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहेत. या प्रकरणामध्ये सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी पाठपुरावा करून महसूल विभाग आणि पोलीस विभागाबाबत या आधीच तक्रारी केल्या होत्या आणि अचानकपणे आता हे प्रकरण कोतवाली पोलिसांकडून काढून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी याबाबत थेट देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे फॅक्स द्वारे तक्रार अर्ज केला आहे.
अहमदनगर येथील उपविभागीय अधिकारी नगरभाग अहमदनगर या कार्यालयामध्ये मौजे भिंगार येथील सर्व्हे नं ४/०८ ब पैकी मधील प्लॉट नं.०७ भुखंड धारक बबन भागचंद बेरड व मौजे भिगांर येथील सर्व्हे नं. १०, ११, १२ ही मिळकत निलेश पेमराज पोखरणा, कांचन प्रकाश बड़ेरा, संजय नारायणदास लोढा, राजेन्द्र जवाहरलाल मालु, शिवाजी मारुतीराव अनभुले, नुतन प्रभाकर बोरकर व मौजे सावेडी सर्व्हे नं ८७/अ पैकी मधील प्लॉट नं. १+१० मधील भुखंड धारक सय्यद फय्याज हाजी मीर अजीमोददीन कवीजंग जहागिरदार या तिन्ही भुखंडधारक यांच्या प्रकरणी स्टेशन हेडक्वॉर्टर अहमदनगर या कार्यालयाचे बांधकाम ना हरकत (बनावट NOC) उपविभागीय अधिकारी नगरभाग अहमदनगर या कार्यालयात सादर केल्याप्रकरणी गेल्या दोन वर्षापासून संरक्षण विभाग व पोलीस प्रशासन कडे सात्यत्याने पाठपुरावा करुन अखेर अहमदनगर येथील कोतवाली पोलीस स्टेशन येथे FIR नंबर ०७५२/२०२२ दि.२८/०९/२०२२ रोजी अज्ञात इसमा विरोधात गुन्हा
दाखल करण्यात आलेला आहे. त्याचा तपास कोतवाली पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक गजेंन्द्र इंगळे हे तपास करीत होते.त्यांनी व त्यांच्या पथकाने गुन्हा दाखल झाल्याबरोबर मुळ आरोपींचा शोध घेऊन तत्काळ दोन
आरोपी अटक केले.व सखोल चौकशी सुरु केल्याने महसुल प्रशासन व बिल्डर मंडळी यांच्या भितीचे वातावरण निर्माण झाल्याने व सदर प्रकरणात संरक्षण विभाग व महसुल विभागाचे अनेक अधिकारी गुंतलेले असल्यामुळे त्याच बरोबर शहरातील मोठेमोठे बिल्डर यांचा सहभाग असल्याने व विशेषता नगर शहरातील एका लोकप्रतिनिधीचा भिंगार येथील एका मिळकतीशी संबंध असल्याने त्यांनी प्रचंड राजकीय दबाव आणला होता तरी सुध्दा तापसी अधिकारी इंगळे व त्यांच्या पथकाने त्यांच्या दबावाला बळी न पडता आपला तपास सुरळीत ठेवला. मात्र अचानक पणे वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी दि. ०६/१०/२०२२ रोजी सायंकाळी राजकीय दबावाला बळी पडून मुळ आरोपींना वाचविण्यासाठी इंगळे यांच्या पथकांकडून तपास काढून घेतलेला आहे सदरची बाब संरक्षण विभागाशी निगडीत असताना त्याची व्यप्ती फार मोठया प्रमाणात असल्याने याचा गांभीर्य विचार घेऊन वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी
श्री इंगळे यांच्या पथकाकडून सदर गुन्हयाचा तपास काढणे उचित नव्हते त्यामुळे मुळ आरोपी व इतर अटक करायचे आरोपी यांना मोकळा राण मिळणार आहे व गुन्हे करण्याची त्यांना धाडस वाढणार आहे.
या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करुन इतर आरोपींचा शोध घेण्याची कारवाई मोठ्या जोमाने सुरु ठेवल्याने अटक न झालेल्या आरोपींचे धाबे दणानले होते. मात्र हा तपास त्यांच्याकडून काढून घेतल्याने सदर आरोपी व दोषी लोकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. सदर प्रकरणात संरक्षण विभागाचा कर्मचारी राजेन्द्रसिंग उर्फ राजाठाकूर यास तीन दिवसापुर्वी अटक करण्यात आली व काल अलीबाग येथून श्री. रोहन गेंदवाल याला अटक केलेली आहे व इतर आरोपीना हि ताब्यात घेण्याचे कार्यवाही तापसी अधिकारी इंगळे यांचे पथकाने केली आहे.
सदरचा तपास त्यांच्याकडून काढून उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्याकडे देण्यात आलेला आहे तो तात्काळ काढून पुन्हा इंगळे यांच्या पथकाकडे तपास वर्ग करण्यात यावे व वरीष्ठ अधिका-यांनी कोणाच्या राजकीय दबावाखाली सदर चा तपास काढल्याची याचीहि चौकशी करण्यात यावी तसेच मौजे भिंगार येथील सर्व्हे नं ४/०८ ब पैकी मधील प्लॉट नं. ०७ भुखंड धारक श्री. बबन भागचंद बेरड व मौजे भिगांर येथील सर्व्हे नं. १०, ११, १२ ही मिळकत निलेश पेमराज पोखरणा,कांचन प्रकाश बडेरा, संजय नारायणदास लोढा, राजेन्द्र जवाहरलाल मालु, शिवाजी मारुतीराव अनभुले, नुतन प्रभाकर बोरकर व मौजे सावेडी सर्व्हे नं ८७/अ पैकी मधील प्लॉट नं. १+१० मधील भुखंड धारक सय्यद फय्याज हाजी मीर अजीमोददीन कवीजंग जहागिरदार या भुखंडधारकांना तत्काळ अटक करण्यात यावी व महानगरपालिका, उपविभागीय कार्यालय नगरभाग, सहाय्यक संचालक नगररचना विभाग या कार्यालयाकडून संरक्षण विभागाच्या हददी लगत दिलेलेल्या परवानगीची सखोल चौकशी करण्यात यावी. या चौकशी प्रकरणात कोतवाली पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक श्री. संपत शिंदे यांना दूर ठेवण्यात यावे. अशी मागणी या पत्रात करण्यात आलेली आहे