Home राज्य ८१ लाखाची लाच मागणाऱ्या जलसंधारण विभागाच्या तीन मोठ्या अधिकाऱ्यांना ५० लाख घेताना...

८१ लाखाची लाच मागणाऱ्या जलसंधारण विभागाच्या तीन मोठ्या अधिकाऱ्यांना ५० लाख घेताना रंगेहात पकडले

चंद्रपूर दि.४ मे
५० लाखांची लाच घेताना जलसंधारण विभागाचे ३ क्लास वन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळयात सापडले. ब्रम्हपुरी येथे ५० लाखांची लाच स्वीकारताना श्रावण शेंडे (वय ४६), प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांना काल रात्री अटक करण्यात आली. सोबतच नागपूर येथून कविजीत पाटील (वय ३२) प्रभारी प्रादेशिक जलसंधारण अधिकारी आणि चंद्रपूर येथून रोहीत गौतम (वय ३५) लेखाधिकारी जलसंधारण कार्यालय यांना देखील अटक करण्यात आली.

या प्रकरणात तक्रारदाराने नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात कोल्हापूर बंधाऱ्याच्या सर्वेक्षणाचे काम केले होते. या कामाचं बिल काढण्यासाठी या तीनही अधिकाऱ्यांनी ८१ लाखांची मागणी केली होती. त्यासाठी ५० लाखांची रक्कम स्वीकारताना नागपूर येथील लाच लुचपात प्रतिबंध खात्याच्या पथकाने कारवाई केली. ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version