Home क्राईम माजी पंचायत समिती सदस्य गोविंद उर्फ आण्णा मोकाटे यांना जामीन मंजूर

माजी पंचायत समिती सदस्य गोविंद उर्फ आण्णा मोकाटे यांना जामीन मंजूर

अहमदनगर दि.७ एप्रिल

अहमदनगर पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद उर्फ आण्णा मोकाटे यांना अहमदनगर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधिश यांनी सन २०२१ चे अत्याचार प्रकरणात नुकताच जामीन मंजूर केला त्याबाबतचा आदेश जिल्हा न्यायायलयाने दि. ०५/०४/२०२३ रोजी पारीत केलेला आहे.
या बाबत सविस्तर हकीकत अशी की, दि. ०४/१२/२०२१ रोजी अहमदनगर येथील एका रहिवासी महिलेने तिचा गोविंद उर्फ आण्णा मोकाटे यांनी सन २०१८-१९ व २०२०-२१ या कालावधीमध्ये मानसिक, शारिरीक छळ करुन तिचेवर अत्याचार केलेबाबत गुन्हा तोफखाना पोलीस स्टेशन येथे तत्कालीन पंचायत समिती सदस्य गोविंद आण्णा मोकाटे यांचे विरुद्ध दाखल केला होता, त्या प्रकरणामध्ये बरेच राजकीय वादंग निर्माण झाले होते व प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी व्यक्तीशः करुन गोविंद मोकाटे यांचे विरुद्ध भा.द.वि.कलम ३७६ तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार दोषारोपपत्र मागील वर्षी मे २०२२ मध्ये दाखल केलेले होते. दरम्यान आरोपी गोविंद मोकाटे यांचे वेळोवेळी अटकपूर्व तसेच अटक झाल्यानंतर जामीन अर्ज फेटाळण्यात आले होते. सदर प्रकरणामध्ये सुनावणी ही मार्च २०२३ मध्ये जिल्हा सत्र न्यायालयात सुरु झाली होती. आरोपी गोविंद मोकाटे यांचे वतीने अॅड. सतिश गुगळे हे या प्रकरणात काम पाहात असताना आरोपी गोविंद मोकाटे यांचे वतीने अॅड. सतिश गुगळे यांनी
जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपीच्या जामीनासाठी अर्ज सादर केला होता, त्यावर सविस्तर सुनावणी पुर्ण होऊन न्यायालयाने वरील प्रमाणे जामीन मंजूरीचा आदेश केलेला आहे.

या प्रकरणातील आरोपी हे राजकीय व लोकनियुक्त व लोकप्रिय व्यक्तीमत्व असलेले आहे व नगर तालुका, नगर शहर तसेच अहमदनगर जिल्ह्याचे या प्रकरणाकडे लक्ष लागलेले होते. प्रकरणाचे सुनावणी दरम्यान फिर्यादी हिची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली त्यामध्ये असलेल्या विसंगती, प्रकरणाचे निकालास लागणारा अनिश्चित कालावधी, वैद्यकीय पुरावे व त्यामधील दोष तसेच साक्षीदार महिला हिचे न्यायालयामध्ये नोंदविण्यात आलेल्या साक्षीमधील महत्वाचे गुणदोष व नगर तालुक्यातील राजकीय वैमनस्यातून आरोपी यास
कशाप्रकारे खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे व त्यावरील कायदेशीर परिस्थिती या सर्व बाबी न्यायालयामध्ये जामीनाचे सुनावणीचे वेळी अॅड. सतिश गुगळे यांनी सविस्तरपणे सादर केल्या व त्या अनुषंगाने उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे जामीन मंजूर कामी न्यायालयापुढे सादर केले व त्या अनुषंगाने सविस्तर युक्तीवाद झाल्यानंतर प्रकरणाचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता, त्याबाबत दि. ५/४/२०२३ रोजी न्यायालयाने गोविंद उर्फ आण्णा खंडु मोकाटे यांची जामीनावर मुक्तता केली.

या प्रकरणात माजी पंचायत समिती गोविंद उर्फ आण्णा खंडु मोकाटे यांचे वतीने अॅड. सतिश एस. गुगळे काम पाहात असून त्यांना अॅड. महेश देवणे, अॅड. हेमंत पोकळे, अॅड. घनश्याम घोरपडे, अॅड. चंद्रकांत भोसले, अॅड. अक्षय गवारे व अॅड. अजित चोरमले हे सहकार्य करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version