HomeUncategorizedगुटखा तस्करी आणि खून प्रकरण नगर शहराला कॅन्सर सारखी गुटखा तस्करीची लागलेली...

गुटखा तस्करी आणि खून प्रकरण नगर शहराला कॅन्सर सारखी गुटखा तस्करीची लागलेली कीड पोलीस जोपर्यंत समूळ नष्ट करणार नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच राहणार….

advertisement

अहमदनगर दि.२० जून

अहमदनगर शहरात सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर खुनाचा थरार झाला. या घटनेत एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला तर एक तरुण मृत्यूशी झुंज देत आहे. याप्रकरणी दाखल झालेली फिर्यादच या घटनेचे मूळ कारण स्पष्टपणे सांगून जातेय अवैद्य व्यवसायाची तक्रार पोलिसांकडे केल्यामुळे त्याचा राग डोक्यात ठेवून खुनासारखी घटना घडली आहे.

गणेश केरुप्पा हुच्चे याने ओंकार घोलप आणि ओंकार पांडुरंग भागानगरे यांचे विरुध्द यापुर्वी काही गुन्हे दाखल केले होते. त्यामुळे त्यांचे पूर्वीपासूनच आपसातील वाद होते 19 जून रोजी दुपारी ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांनी गणेश हूच्चे याच्या सुरू असलेल्या अवैद्य धंद्याबाबतची तक्रार कोतवाली पोलिसांकडे केली होती.त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुटखा,दारू,जुगार अशा अवैध धंद्यांवर छापा टाकून कारवाई केली होती. मात्र ही कारवाई ओंकार घोलप आणि ओंकार भागानगरे यांच्या अर्जामुळे झाली असल्याचा राग मनात धरून गणेश हुच्चे आणि त्याच्या साथीदारांनी त्याच रात्री एक वाजता ओमकार घोलप ओंकार आणि त्यांचा तिसरा मित्र शुभम पडोळे यांना रात्रीच्या सुमारास बालिकाश्रम रोडवर गाठून तलवारीने वार केले या घटनेत ओंकार भागानगरे हा मयत झालाय तर पडोळे  गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देतोय. मात्र या तरुणाच्या मृत्यूचे कारण म्हणजे गुटखा तस्करी होय जर पोलिसांनी वेळीच या गुटखा तस्करी बद्दल हस्तक्षेप केला असता तर एवढी मोठी घटना नक्कीच घडली नसती.

अहमदनगर शहरात या आधी नाशिकच्या आय जी पथकाने छापा टाकून मोठा गुटक्याचा मोठा साठा पकडला होता त्यावेळी गणेश हुच्चे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता नगर शहरात मोठ्या प्रमाणावर बंदी असलेला गुटखा छुप्या मार्गाने येत असून याचे वितरण छोट्या व्यवसायिकाना होत असते. मात्र या गुटक्याच्या माध्यमातून लाखो रुपयांची मलई सहजपणे मिळत असल्यामुळे अनेक जण या गुटखा तस्करी व्यवसाय आपला जम बसवत आहेत. त्यामुळे व्यवसायातील स्पर्धेमुळे अनेक वेळा वाद होतात आणि एकमेकांच्या व्यवसाया विषयी पोलिसांना माहिती पुरवली जाते. हा गुटका व्यवसाय आज नाही तर अनेक वर्षांपासून सुरू असून अनेक व्हाईट कॉलर लोक या धंद्यामध्ये उतरले आहेत.नगर शहरात गुंडागर्दी वाढण्याचे कारणही हा अवैध गुटखा तस्करी असून जोपर्यंत अवैध गुटखा तस्करी करणारे समूळ नष्ट होणार नाहीत तोपर्यंत कॅन्सर सारखा हा गुटका नगर शहराला सडवत राहील त्यामुळे पोलिसांनी आता या गुटक्या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे. अन्यथा भविष्यात पोलिसांनाही या गोष्टीचा मोठा त्रास होऊ शकतो.

या खून प्रकरणात जे तीन आरोपी फिर्यादीमध्ये देण्यात आले आहेत त्या सर्वांचे कॉल डिटेल काढल्यास सर्व काही सत्य समोर येऊ शकते विशेष म्हणजे यातील काही लोक रात्रंदिवस पोलीस स्टेशनच्या आवारात पाहण्यास मिळत होते आणि या लोकांची एवढी हिंमत कोणामुळे वाढली याचा तपासही होणे गरजेचे आहे.

आज एक तरुण भावी आयुष्याचे स्वप्न पाहत असताना त्याचा असा अंत होणे हा त्याच्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळण्यासारखे आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular