अहमदनगर दि.२०जून
अहमदनगर शहरात सोमवारी मध्यरात्री ओंकार भागानगरे याचा खून झाल्या नंतर शहरात एकच खळबळ उडाली होती अवैद्य धंदे करण्याच्या कारणातून हा खून झाल्याचे समोर आले आहे.
मयत ओंकार भागानगरे याचे शवविच्छेदन
औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात आले.
ओंकार भागानगरे याचे मारेकरी पकडल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्याच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी घेतली होती. ओंकार भागानगरेया चा मृतदेह जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणणार असल्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ओंकार भागानगरे याच्या कुटुंबीयांनी आणि इतर नातेवाईकांनी ठिय्या मांडला होता.
मात्र यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मृतदेह ताब्यात घेण्याचं कुटुंबीयांनी मान्य केलं मात्र याच वेळेस काही कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना एक निवेदन दिले त्यामध्ये या प्रकरणामध्ये स्थानिक आमदार आणि त्यांच्या अप्तांचा हात असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आले होते मात्र काही वेळानेच ज्या इसमाच्या नावे हे निवेदन देण्यात आले होते त्याच इसमाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यासमोर जाऊन या निवेदनाशी माझा काहीही संबंध नसून काही लोकांनी या निवेदनावर घाईघाइने माझी सही घेतली त्यात काय नमूद होते ते मी वाचले नाही असे लेखी लिहून दिले. त्यामुळे अशा घटना मागे राजकारण कोणत्या स्थारापर्यंत जाते हे समोर येतेय .कुटुंबातील मुलगा मृत्युमुखी पडला असताना या मृत्यूवर राजकारण करणे म्हणजे ही राजकारणाची अत्यंत नीच पातळी काही राजकीय लोकांनी ओलांडली आहे.
विशेष म्हणजे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात ओंकार भागानगरे याचा मृतदेह आणला जाणार असल्याने या ठिकाणी त्याचे नातेवाईक जमले होते त्यावेळी राजकीय नेत्यांनी भाषण बाजी सुरू करताच भागानगरे कुटुंबीयांनी तिथून निघून जाणे पसंत केले. आम्हाला न्याय हवा भाषण बाजी नको असेही यावेळी सांगण्यात आले.
त्यामुळे नगर शहरात कोणतीही घटना झाली की त्याला राजकीय वळण देऊन अशा कठीण प्रसंगी राजकीय पोळी भाजून घेण्याचं काम काही राजकीय नेते करत आहेत. याचा आता नागरिकांना कंटाळा आला असून आजच्या घटनेवरून लोकांना असे घाणेरडे राजकारण नकोय असा स्पष्ट संदेश राजकीय नेत्यांना दिल्याचं दिसून येतेय.