अहिल्यानगर दिनांक 4 जानेवारी
मुकुंद नगरभागात शनिवारी रात्री उशिरा चांगलाच रडा झाल असून पैलवान म्हणून घेणाऱ्या शेख बंधूंनी अब्रार शेख या बावीस वर्षीय तरुणास जीवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली.
या बाबत घटनेची माहिती अशी की अब्रार शेख हा शनिवारी रात्री मुकूंद नगर परिसरातील अल अमिन ग्राऊंड येथे दुचाकी वरूनआला असता त्या ठिकाणी आधीच खूप तरुण टोळक्याने उभे होते गर्दीतून वाट काढत असताना अब्रार शेख याने गाडीचा हॉर्न वाजवला त्यावेळी गर्दींमधुन काही मुलांनी अब्रार शेख याच्या कडे पाहिले आणि म्हणाले की हा समद मेंबरचे बॉस बॉस असे लिहून इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत असतो.याला थांबवा म्हणत गर्दीतील कही अनोळखी तरुणांनी अब्रार शेख याला गाडीवरून खाली ओढून मारहाण करण्यास सुरुवात केली.त्यावेळी त्या गर्दीतील अफजल आसीर शेख (अफजल पैलवान) व अस्लम आसीर शेख (अस्लम शेख पैलवान) यांना जवळ बोलावुन सांगितले की, ये लड़का वही है. जो समद मेंबर के बॉस बॉस लिखकर इंन्स्टाग्राम पर स्टोरी और पोस्ट रखता है. असे सांगितल्याने अफजल पैलवान याने स्वतःच्या जॅकेटमधुन बंदुक काढून अब्रार शेख याच्या डोक्याला लावली आणि त्यास म्हणाला तुझो और तेरे बॉस को जान से मार दूंगा असे म्हणताच अस्लम पैलवान याने अब्रार याच्या कानाखाली मारली व त्याचे जवळील चॉपरने अचानक माझ्या डोक्यात वार केला. त्यावेळी गर्दीतील इतरांनी अब्रार यास खाली पडून मारहाण करण्यास सुरुवात केली.

या घटने नंतर अब्रार शेख यास त्याच्या मित्रांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते त्यानंतर अब्रार याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रुग्णालयात दिलेल्या जबाबदावरून भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये
अब्रार शेख यास मारहाण करणारे अफजल असीर शेख (अफजल पैलवान),अस्लम असीर शेख (अस्लम पैलवान) तसेच चार पाच अनोळखी इसम यांच्या विरोधात भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात
(बी एन एस), 109, (बी एन एस) 118(1) 3 (बी एन एस), 115(2) (बी एन एस), 2023 351(2) 5 (बी एन. एस), 2023 351(3) (बी एन एस), 2023 352 7 (बी एन एस), 2023 189(2), (बी एन एस), 2023 191(2), (बी एन एस), 2023 191(3), (बी एन एस), 190 11 शस्त्र अधिनियम, १९५९ 3 12 25 13 शस्त्र अधिनियम, १९५९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ 37(1) 14 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ 37(3) 15 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ 135 3. (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.