अहिल्यानगर
अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असून अर्ज भरून अर्ध माघारी आणि आता अनुक्रमांक आणि अपक्ष उमेदवारांना चिन्हेही भेटले आहेत.त्यामुळे आता उमेदवार जाहीर प्रचार करण्यास मोकळे झाले असून कालपासूनच अनेक उमेदवारांनी आपल्या अनुक्रमांकसह आणि चिन्हासह प्रचार सुरू केला आहे.

अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षाची युती आहे. अनेक प्रभागांमध्ये दोन्ही पक्षाचे दोन दोन उमेदवार उभे असल्यामुळे उमेदवारांच्या कुटुंबीयांनी आणि उमेदवारांनी पॅनलचा प्रचार करणे बंधनकारक असताना आता भारतीय जनता पार्टीचा एका उमेदवाराच्या वडिलांनी थेट फक्त कमळ मारा आणि मतदाराने इतर सहकाऱ्यांची पॅनलची नावे विचारल्यावर त्याला स्वतःच्याच पक्षाच्या उमेदवाराचे नाव माहित नसल्याची धक्कादायक गोष्ट एका ऑडिओ क्लिपमधून समोर आली आहे. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या दिवशी भाजपच्या उमेदवाराच्या एकला चलो चा नारा समोर आला आहे.
मतदारांना फोन केल्यानंतर पॅनल मधील सर्वांना मतदान करा आणि सर्वांचे नावे उमेदवारांच्या कुटुंबीयांना माहीत असणे गरजेचे आहे. मात्र असे न होता प्रभाग क्रमांक तीन मधील एका उमेदवाराच्या वडिलांनाच पॅनल मधील इतर सहकाऱ्यांचे नाव विचारल्यानंतर जर पॅनल मधील उमेदवारांचे नाव माहीत नसेल तर पॅनल खऱ्या अर्थाने निवडून येईल का ? असा प्रश्न आहे.
त्या ऑडिओ क्लिप मध्ये झालेली गंमत म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या एका उमेदवाराच्या वडिलांनी मतदाराला फोन केला आणि आपला मुलगा उमेदवार म्हणून उभा आहे त्याला मदत करा फक्त कमळ चिन्ह पहा आणि त्याच्यावर बटन दाबा त्यानंतर समोरच्या मतदाराने आपल्या पॅनलमध्ये इतर कोण आहेत असे विचारले नंतर त्यांनी दोन मिनिटे विचार करून शेजारी असलेल्या कोणाला तरी विचारून मग उमेदवारांची नावे सांगितली त्यामुळे उमेदवाराच्या वडिलांनाच पॅनल मध्ये कोण आहे का नाही हे माहीत नसल्यामुळे पॅनलचे भवितव्य धोक्यात आले आहे. आणि सुरुवातीला फक्त कमळ दाबा असेच म्हणल्यामुळे मतदाराही चक्रावून गेला आहे.