Homeक्राईमधक्कादायक... तुमने गलती की केस करके.... डायलॉग मारत तरुणीचे हात बांधून मारहाण...

धक्कादायक… तुमने गलती की केस करके…. डायलॉग मारत तरुणीचे हात बांधून मारहाण…

advertisement

अहमदनगर दि.२० मार्च
अहमदनगर शहरातील एका कॉलेज मध्ये शिक्षण घेणाऱ्या तरुणीला हातपाय बांधून मारहाण केल्याची घटना घडली असून तरुणीने छेड छाडीची तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाने हा प्रकार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर शहरा जवळ असणाऱ्या परिसरात राहणारी तरुणी नगर शहरातील न्यू आर्ट कलेज मध्ये शिक्षण घेत असून त्या तरुणीला १९ मार्च रोजी तिच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने तरुणीची छेड काढली होती.त्या बाबत तरुणीच्या तक्रारी वरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी ती तरुणी कॉलेजचे प्रॅक्टिकल असल्यामुळे कॉलेज मध्ये प्रॅक्टिकल साठी आली होती. प्रॅक्टिकल संपल्यानंतर दुपारी निघाली असताना प्रॅक्टिकल हॉलच्या बाहेर काही तरुण तोंडाला स्कार्फ बांधून आले आणि त्यांनी त्या तरुणीचे हात पाय हात पकडले तर इतर मुलांनी तरुणीच्या पोटात लाथ मारून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि मारहाण करण्यांपैकी एकाने तुमने गलती कि केस करके असा दम देत दगडाने त्या तरुणीच्या डोक्यात मारहाण केली. या मारहाणही ती तरुणी बेशुद्ध झाली. काही वेळानंतर तरुणी जेव्हा शुद्धीवर आली होती तेव्हा तिचे हात बांधून ठेवण्यात आले होते. त्यावेळी आलेल्या तिच्या मोबाईल वरील कॉल मुळे तिच्या कुटुंबीयांना ही माहिती समजली त्यामुळे तिच्या तुम्ही यांनी ताबडतोब कॉलेज मध्ये धाव घेऊन तिची सुटका केली आणि तिला खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केल.

याबाबत तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तर याबाबत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असून आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना केली आहेत.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular