HomeUncategorizedमराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पारनेर मध्ये जाहीर सभा..

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची पारनेर मध्ये जाहीर सभा..

advertisement

अहमदनगर दि.२० मार्च
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात पुन्हा एकदा सुरू झाला असून अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात 23 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता बाजारतळ येथे भव्य सभा होणार आहे. त्यासाठी पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांकडून सभेची जय्यत तयारी सुरू आहे.

बुधवारी मनोज जरांगे पाटील यांची सभा परळी येथे होणार आहे यासाठी स्थानिक प्रशासनाने या सभेला परवानगी दिली नसल्याने अखेर न्यायालयाकडून सभेसाठी परवानगी मिळाली असून परळी येथे भव्य सभा होणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र दौरा सुरू केला असून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे तसेच सगीस्वरांच्या बाबत अधिसूचना काढावी या प्रमुख मागण्यांसह इतर काही मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील आग्रही आहेत.
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनानंतरही त्या आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केली असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी वेळोवेळी केला आहे. मात्र मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण नव्हे तर ओबीसी मधूनच आरक्षण मिळावे आणि सगेसोयर्या बाबत अधिसूचना काढावी या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यासाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्रभर दौरा सुरू असून अहमदनगर मधील पारनेर तालुक्यात 23 मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता मनोज जरांगे पाटील यांची तोफ धडाडणार आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार मराठा समाजाला काय दिशा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्रभर सुरू असलेल्या दौरांमुळे मात्र राजकीय नेत्यांची चांगलीच गोची होत आहे. अनेक ठिकाणी पुढार्‍यांना गावबंदी केल्याने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नेत्यांना आता चांगलीच अडचण निर्माण होणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular