Homeक्राईमबालकामगारांना कामास ठेवणाऱ्या सावेडीतील तीन दुकानमालकांवर गुन्हे पाच बालकामगारांची सुटका चायनीज,नगरचा डबेवाला,पार्वती...

बालकामगारांना कामास ठेवणाऱ्या सावेडीतील तीन दुकानमालकांवर गुन्हे पाच बालकामगारांची सुटका चायनीज,नगरचा डबेवाला,पार्वती कॉर्नरचा समावेश

advertisement

अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर

चाईल्डलाईन संस्थेच्या पुढाकारातून आणि
जिल्हा कामगार कार्यालय यांच्या माध्यमातून अहमदनगर शहरातील सावेडी भागातील तीन दुकानावर छापे टाकून पाच बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे.

जिल्हा कामगार अधिकारी यास्मीन शेख यांनी बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियमन १९८६ अंतर्गत कलम ३ ए चे उल्लंघन केले म्हणून तोफखाना पोलिस ठाण्यात नगरचा डबेवालाचे मालक
आदित्य कांतीलाल त्रिमुखे,पार्वती कॉर्नरचा मालक योगेशवरमेश शेरकर (वय ३५ वर्षे), कुष्ठधाम रोड, सोनानगर चौक येथील चायनीज कॉर्नरचे मालक मनोज सुरेश बोज्जा व विशाल बहिरू धात्रक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वय वर्षे १४ ते १७ असलेले बालकामगार या ठिकाणी काम करताना आढळून आले. पार्वती कार्नर आणि चायनीज कॉर्नर येथे प्रत्येकी दोन तर नगरचा डबेवाला येथील एक अशा पाच बालकामगारांची यावेळी सुटका करण्यात आली.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular