अहमदनगर दि.२३ नोव्हेंबर
अहमदनगर शहरातील सावडी उपनगर भागातील सामाजिक कार्यकर्ते आणि बाळासाहेबांची शिवसेनेचे उपशहर प्रमुख आणि सूर्या फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत उर्फ काका शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल लायन्स क्लब ऑफ मिडटाऊन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी ९.३० ते दुपारी २.३० वा या वेळेत गणेश मंदिर, गणेश चौक सिव्हील हडको येथे विविध आजारांवर मोफत सर्वरोग तपासणी व होमिओपॅथिक उपचार शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती काका शेळके यांनी दिलीय.
या शिबीरामध्ये त्वचा विकार, इसब नावाट, पिंपल्स, सोरायसिस, चाई लागणे, खरुज, पांढरे डागा, मस, चामखीळ,कुरुप, केसांच्या समस्या, केस गळणे, केसात कोंडा होणे, केस दुभंगमे, मुळव्याध, भंगदर, फिशर, पित्त, पित्ताशयाचे खडे, मुतखडा, प्रोस्टेड ग्रंथीची वाढ, बद्धकोष्ठता, अल्सरेटिव्ह कोलायटीस, मधुमेह, स्त्रियांच्या मासिक पाळीचे विविध विकार, मेनोपॉज, अंगावरुन पांढरे जामे, वंध्यत्व, लठ्ठपमा, पी सी ओ डी. गाऊट, मणक्यांचे विकार, संधीवात, दमा, अॅलर्जी, नेहमी होणारी सर्द, कान फुटमे, टॉन्सीलायटीस, मनोविकार या सारख्या विविध आजारांवर तज्ञ होमिओपॅथीक डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांची तपासणी करुन होमिओपॅथीक उपचार करण्यात येणार आहे.
शिबीरात आलेल्या रुग्णांची पुढील तपासणी अहमदनगर होमिओपॅथीक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल सावेडी रोड, येथे करण्यात येणार आहे.
तरी या संधीचा गरजु रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे डॉ. भुषण अनुभुले, उपाध्यक्ष भुषण चंगेडे, खजिनदार डॉ. विलास बी. सोनवणे, सचिव डॉ. डी. एस. पवार, सहसचिव लक्ष्मीनिवास सारडा, संचालक बोरा आर. एस.,अभय मुथ्था, शिवाजी रणसिंग, डॉ. समीर होळकर, राजेंद्र मेहेत्रे, डॉ. ऋतुजा चव्हाण तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनिल पवार व आर एम ओ. डॉ. माधुरी मोरे तसेच लायन्स क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा सचिव प्रसाद मांढरे, खजिनदार संदिप सिंग चव्हाण यांनी दिली आहे.