अहिल्यानगर दिनांक 1 जुलै
अमीर खानचा “पी.के’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटात कपडे मिळवण्याचे एकमेव ठिकाण असलेल्या “डान्सिंग-कार’चा सीन वेगळी ओळख निर्माण करून गेला. मात्र आता अशा “डान्सिंग-कार’ आता अंधाऱ्या रात्री शहरात अनेक ठिकाणी पाह्यला मिळतात. विशेषतः सावेडी उपनगरातील अनेक मोकळे ग्राऊंड निर्मनुष्य रस्ते आडोशाच्या जागा याठिकाणी या “डान्सिंग-कार’ उभा असतात.
शहरातील लालटकी भागात असलेल्या एका सरकारी वसाहती मध्ये एक कार अशाच प्रकारे रविवारी रात्री उभी होती.या परिसरात जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी राहतात तर आजूबाजूला प्रतिष्ठित नागरिक वास्तव्यास आहेत.रात्री काही नागरिक जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी रस्त्यावरून चक्कर मारत असताना काहींना रोड वर लागलेल्या गाडीचा संशय आला.कारण गाडी हलत होती.
दिसलेला प्रकार काही सजग नागरिकांनी पोलिसांच्या कानावर घातला तात्काळ तोफखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्या वसाहतीत धाव घेऊन डान्सिंग कार मधे तपासणी केली असता एक तरुण आणि तरुणी मद्यधुंद अवस्थेत दिसली.मात्र दोघेही सज्ञान असल्याने पोलिस त्यांच्यावर कारवाई करू शकले नाही मात्र त्यांना सज्जड समज देऊन सोडण्यात आले.
सध्या शहरातील अश्लिल चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या कॅफे चालकांवर कारवाई केली असल्याने अनेक ठिकाणी कॅफे पोलिसांच्या धाकाने बंद आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःची गाडी असल्याने डान्सिंग कार जोमात आहेत.
अशा प्रेमीयुगलांचे चाळे रहिवाशांच्या त्रासाचा विषय झाला आहे. महाविद्यालयीन तरुणांच्या या प्रकारामुळे रहिवासी कमालीचे त्रस्त झाले असून अशा प्रकरणांना रोखण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.