अहिल्यानगर १ जुलै
नगर शहरातील सराईत गुन्हेगार बंटी ऊर्फ भावेश अशोक राऊत याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई करून एक वर्षासाठी त्याला स्थानबद्ध करण्यात आले आहे.
बंटी राऊत याच्याविरूद्ध शहरातील तोफखाना, कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खंडणी, सरकारी कामात अडथळा आणणे, शस्त्र बाळगणे, दंगा, दरोडा आदी गुन्ह्यांचा समावेश आहे. राऊत याच्यावर कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोतवाली पोलिसांकडून मागविण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊन राऊत विरोधात ही कारवाई केली आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, सुथोअप्पर अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपअधीक्षक अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने राऊत याला अटक करून नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
या पूर्वी बंटी राऊत यांच्या विरोधात २०२० मध्ये सुधा अशी कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर सुद्धा बंटी राऊत याच्या आचरणात कोणतीच सुधारणा झाली नव्हती.
MPDA कायदा म्हणजे Maharashtra Prevention of Dangerous Activities of Slumlords, Bootleggers, Drug-offenders, Dangerous persons and video pirates Act, 1981 . हा कायदा महाराष्ट्रात सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी आहे.