अहमदनगर दि 30 डिसेंबर
अहमदनगर शहरातील गुंडागर्दी वाढत असून गेल्या तीन दिवसात अहमदनगर शहरात विविध घटनांमध्ये दहशतीचे प्रकार झाले असून याप्रकरणी विविध पोलीस स्टेशन मध्ये पुणे दाखल करण्यात आले आहेत. याच अनुषंगाने अहमदनगर शहरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंटी डापसे यांना मुकुंद नगर मधील बाबा खान आणि त्याच्या साथीदारांनी फोनवरून धमकी देऊन थेट तलवारी आणि दांडके घेऊन मारण्यासाठी बंटी डापसे यांच्या दुकानावर पोहोचले होते. मात्र सुदैवाने बंटी डापसे हे आपल्या कुटुंबियांसमावेत बाहेर असल्याने दुकानावर त्यांचे वडील होते. त्यावेळी त्यांच्या वडिलांना धमकी देऊन ही गुंड टोळी पसार झाली. या गुंडांच्या हातामध्ये तलवारी दांडके आणि बंदुकी असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे बंटी डापसे यांनी केली असून यामागे मुकुंद नगर मधील अंडा गँग टोळीचा हात असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
या टोळीचा प्रमुख बाबा खान यास राजकीय पार्श्वभुमी असल्याने तो त्याच्या साथीदारकडुन गुन्हेगारी कामे
करुन घेत असतो. सदर बाबखान याची मुकुंदनगर तसेच नगर शहरात दहशत असुन बाबा खान हा मला मी समाजिक कार्य करीत असल्याने सतत जीवे मारण्याची धमकी देत आहे. त्यामुळे त्याच्या व त्याच्या साथीदारांवर कोठारात कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना बंटी डापसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी दिलीप सातपुते, वसंत लोढा, नितीन शेलार, कुणाल भंडारी,ओमप्रकाश बायड, बाळासाहेब भुजबळ बाळासाहेब साठे ,उमेश साठे, राहुल तुरे दीपक खंडेलवाल आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश बोला यांची भेट घेऊन या सर्व गुंडांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. या लोकांमुळे शहरात दोन समाजामध्ये तेढ पसरून सामाजिक अशांतता निर्माण होत असल्याने या गुन्हेगारी टोळीवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.