अहमदनगर दि.१ जानेवारी
नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल रेस्टॉरंट विविध रोडवरील चौपाटी सज्ज होत्या आणि प्रत्येकाने नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळे बेत आखले होते.मात्र अहमदनगर शहरातील राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी एक नवीन समाजाला दिशा देणारा उपक्रम राबवला असून.त्यांनी काही तरुणांसोबत नवीन वर्षाचे स्वागत नगर शहरातील अत्याचारीत महिलांचे संगोपन करणाऱ्या माऊली प्रतिष्ठान संचालित मनगाव या केंद्रात जाऊन नवीन वर्षात तरुणांना प्रेरणा मिळेल अशा
डॉ. राजेंद्र व सुचेता धामणे या डॉक्टर दाम्पत्याची भेट घडवून आणून संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.
या संस्थेत सध्या सुमारे 400 अत्याचारित महिला वास्तव्यास आहेत आणि सुमारे 40 मुलांचा सांभाळ हे दाम्पत्य स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त काळजीने संगोपन करत आहे. अशा या मनगाव या केंद्रात जाऊन आमदार संग्राम जगताप यांनी तरुणांना या केंद्राच्या कामाची माहिती दिली तसेच डॉक्टर राजेंद्र व सुचिता धामणे यांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कार्य तरुणांना समजून सांगितले 31 डिसेंबरला विविध कार्यक्रम आयोजित करत असताना सामाजिक कार्याचे भान ठेवून आपण या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतून आमदार संग्राम जगताप यांनी तरुणांना घेऊन थेट मनगाव केंद्र गाठून तेथील कार्याची माहिती तरुणांना दिली.
या ठिकाणी 400 महिला या अत्याचारित असून त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी सोडून दिले आहे तर त्यांची मुलं या ठिकाणी वास्तव्यास आसून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचे काम या ठिकाणी होत आहे. अत्यंत सुंदर निसर्ग रम्य परिसर असलेल्या मनगव प्रकल्पा मध्ये सुमारे तीन तास आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या सोबतच्या तरुणांनी घातले आणि येथील कार्याची माहिती करून घेतली येथे वास्तव्य असलेल्या महिलांबरोबर त्यांनी संवाद साधला महिलांनीही त्यांच्याबरोबर संवाद साधून आपले मनमोकळे केले.
आमदार संग्राम जगताप यांनी आम्हाला कोणतीही पूर्व कल्पना देता आमच्या प्रकल्पाला आचरणातपणे भेट देऊन तरुणांना 31 डिसेंबर सह नवीन वर्षाची वेगळी संकल्पना साजरी करण्यासाठी प्रोत्साहित केले आणि तरुणांना वेगळी दिशा दाखवण्याचे काम अशा राजकारणी लोकांनी करणे गरजेचे असल्याचे मनगाव प्रकल्पाचे संस्थापक डॉक्टर राजेंद्र धामणे यांनी सांगितले.
आमदार म्हणून संग्राम जगताप नेहमीच सामाजिक कार्य करत असतात मात्र जगाच्या कोपऱ्यात अशा अत्याचारीत महिलांचे जग आहे आणि त्या कशा प्रकारे जगतात याची माहिती आम्हाला देऊन समाजासाठी काहीतरी काम करणे गरजेचे आहे. यासाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीचा संकल्प आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्हाला करण्यास मिळाल्याची भावना त्यांच्याबरोबर आलेल्या तरुणांनी व्यक्त केली आहे.
ना हॉटेलिंग, ना धांगडधिंगा या पासून दूर कुठेतरी असलेल्या समाजामधील उपेक्षित महिलांच्या सानिध्यात नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा पायंडा निश्चितच या समाजाला दिशा देणार असून आमदार संग्राम जगताप यांनी तरुणांना साठी नवीन वर्षाच्या सुरवातीला हा उपक्रम राबवला आहे.