Home राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

मुंबई दि. ५ जून
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटरवरून कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली. सध्या प्रकती स्थिर असून विश्रांती घेणार असल्याचं सांगितलं आहे. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मात्र काळजी करण्याचे काही कारण नाही. मी सध्या होम आयसोलेशनमध्ये असून, घरीच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत आहे. माझ्या जे संपर्कात आले आहेत, त्यांनी देखील कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी देखील एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा त्यांनी सरकारी रुग्णालयात उपचार घेतले होते. आता पुन्हा एकदा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान फडणवीस यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी आपल्या सर्व राजकीय कार्यक्रम रद्द केले आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version