Homeराजकारणसत्तेच्या संग्रामात अव्वल.. आमदार संग्राम जगताप... कार्यसम्राट विकास पुरुष आमदार संग्राम जगताप....

सत्तेच्या संग्रामात अव्वल.. आमदार संग्राम जगताप… कार्यसम्राट विकास पुरुष आमदार संग्राम जगताप….

advertisement

अहमदनगर दिनांक 12 जून
आमदार संग्राम जगताप म्हणजे सतत हसमुख असलेला चेहरा दांडगा जनसंपर्क आणि युवकांमध्ये लोकप्रियता यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील विविध ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे चाहते आहेत. नगरसेवक म्हणून सुरू केलेली कारकीर्द आता आमदारकीपर्यंत येऊन ठेपली आहे. 2019 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवून कमी वेळात विक्रमी मते घेण्याचा मान ही आमदार संग्राम जगताप यांच्याकडे जातो. आमदार संग्राम जगताप यांनी आता अहमदनगर शहराची ओळख बदलण्यासाठी राज्य सरकारकडून जवळपास 235 कोटी रुपयांचा निधी आणलेला आहे.


नगर शहरातील विविध रस्त्यांसाठी लोकसभेच्या आचारसंहितेच्या आधी दीडशे कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. त्यानंतर पुन्हा राज्य सरकारने नगर शहरातील मूलभूत सोयीसुविधा, विकासकामांसाठी नव्याने कोटी रुपयांचा तसेच भिंगार शहरातील मूलभूत सोयीसुविधांसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच आता या निधीमधून कामे सुरू होणार आहेत.

त्याचप्रमाणे गंगा उद्यान येथे म्युझिकल फाउंटन आणि गंगा उद्यान मागील मैदानावर क्रीडा संकुल होणार असून गंगा उद्यान मधील म्युझिकल फाउंटनचे चे काम सध्या प्रगतीपथावर आहे तर क्रीडा संकुलनाच्या कामास लवकरच सुरुवात होणार आहे. भोसले आखाड्यातील म्युझिकल फाउंटन सध्या नगरकरांच्या सेवेत दाखल झाले असून महानगरपालिकेचे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल लवकरच बुरूडगाव रोडवर सुरू होणार आहे त्याचे कामही सध्या प्रगतीपथावर आहे. त्याचप्रमाणे शहरातील सर्वच रस्ते कॉंक्रिटीकरण होणार असून उपनगरातील जवळपास सर्वच रस्ते काँक्रिटीकरण होत आहेत त्यामुळे अहमदनगर शहर हे खड्ड्यांचे शहर असल्याचे आणि अहमदनगर शहर खेड असल्याची ओळख आता पुसत चाललेली आहे गेल्या पंचवीस वर्षापासून रखडलेला विकास आता खऱ्या अर्थाने गती घेताना दिसतोय.

अहमदनगर शहरातील महापुरुषांचे पुतळे उभारण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाठपुरावा करून आता लवकरच अहमदनगर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे पूर्ण कृती पुतळे शहरांमधील विविध भागात उभारण्यात येत आहेत.

आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना फुले अथवा पुष्पगुच्छ न आणता शालेय पुस्तके आणि वह्या घेऊन येण्याचा तसेच आपापल्या परिसरात वृक्षारोपण करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे अनेक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम सुरू असून वाढदिवसानिमित्त मिळालेले वह्या आणि पुस्तके शालेय मुलांना देण्यात येणार आहे. असा स्तुत्य उपक्रम यावर्षी आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त राबवला आहे.

वारकरी संप्रदायातील वातावरण पहिल्यापासूनच घरात असल्यामुळे माजी आमदार अरुण काका जगताप यांचे मार्गदर्शन आणि त्यांची शिकवण यामुळे अल्पावधीतच संग्राम जगतात यांनी आपल्या कामाने अहमदनगरकरांची मन जिंकून घेतले आहे. एखादं काम हाती घेतले की ते पूर्णत्वास नेणे हीच त्यांच्या कामाची पद्धत कार्यकर्त्यांचे मोठा जाळ आमदार संग्राम जगताप यांनी अहमदनगर शहरात विणले असून या कार्यकर्त्यांच्या बळावर ठिकठिकाणी विकास काम सुरू आहेत. सर्वसामान्यांच्या कामासाठी एका हकेवर पळणारा माणूस म्हणून आमदार संग्राम जगताप यांचे नाव घ्यावेच लागेल.

राजकीय परिस्थिती पाहता अहमदनगर शहरात राजकीय प्रचंड विरोध असतानाही केवळ जनतेच्या मनावर अधिराज्य करणारा आणि जनतेमधून निवडून येणारा आमदार म्हणून आमदार संग्राम जगताप यांनी आपलं नाव अहमदनगर शहराच्या इतिहासामध्ये कोरले आहे प्रत्येक नागरिकांसाठी अहोरात्र झटणाऱ्या या आमदारास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्यांच्या हातून अहमदनगर शहराचा विकास होऊन अहमदनगर शहर हे स्मार्ट सिटी म्हणून ओळखले जावे हीच सदिच्छा…

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular