Homeजिल्हानाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे ऍड. धनंजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी...

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपचे ऍड. धनंजय जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकला रवाना

advertisement

अहमदनगर

नाशिक पदवीधर मतदार संघाचे निवडणुकीचा अर्ज भरण्याचा आजचा 12 जानेवारी हा शेवटचा दिवस असून अद्यापही भारतीय जनता पार्टी कडून नाशिक मतदार संघातील उमेदवार जाहीर न झाल्यामुळे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची उत्कंठा वाढत आहे. नेमकी उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सर्वांचीच उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अहमदनगर शहरातून एडवोकेट धनंजय जाधव यांनी भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे. तर धुळे मधून धनंजय विसपुते यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून मागणी केली आहे.

मात्र भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या मनात वेगळेच काहीतरी गणिते असल्यामुळे आणि काँग्रेसला मोठा धक्का देण्याच्या रणनीतीमध्ये भाजपने अद्यापही नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवार जाहीर केला नाही. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने एडवोकेट धनंजय जाधव हे नाशिकला रवाना झाले असून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.पक्षाचा आदेश अंतिम राहील असेही त्यांनी सांगितले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉक्टर सुधीर तांबे हे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज महाविकास आघाडीच्या वतीने दाखल करणार आहेत. त्यामुळे आता भाजपच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते याबाबत अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, धुळे ,नंदुरबार ,जळगाव या ठिकाणच्या भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागून

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular