Homeराज्यविधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुभाष चिंधे यांच्याकडून अर्ज दाखल

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सुभाष चिंधे यांच्याकडून अर्ज दाखल

advertisement

अहमदनगर-दि.११ जानेवारी

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी दैनिक नगर स्वतंत्रचे संपादक तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष चिंधे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याकडे उमेदवारी अर्ज केला. गुरुवारी (दि.12) रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंत 100 जणांनी अर्ज नेले होते.

चिंधे यांनी बुधवारी दुपारी अर्ज दाखल केला. यावेळी प्राध्यापक संजय शेवाळे, शेखर भाऊ अंधारे, सुभाष मुदळ आदी उपस्थित होते. गत काही महिन्यांपासून चिंधे यांनी पदवीधर निवडणुकीची तयारी चालवली आहे. यापूर्वी शिंदे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदाची निवडणूकही लढविली आहे. चिंधे हे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असतात. पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठीही त्यांनी नेहमी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही गेल्या तीन वर्षापासून काम करत आहेत. शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ते नेहमी आग्रही राहिले आहेत. शिक्षकांच्या मुंबई येथे झालेल्या मोर्चाच्या वेळी झालेले आक्रमक भाषण आजही अनेक शिक्षकांच्या स्मरणात आहे. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर चिंधे म्हणाले की आपण पदवीधरांच्या आणि शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी या निवडणुकीच्या मैदानात उतरलो आहे. या निवडणुकीसाठी गत काही दिवसांपासून मतदार असलेल्या पाचही जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. कोणत्याही राजकीय पक्षाने अद्यापपर्यंत उमेदवारी जाहीर केलेले नाही. त्याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे. अहमदनगर, नाशिक, नंदुरबार, धुळे, आणि जळगाव असे पाच जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या पदवीधर निवडणुकीसाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अहमदनगर जिल्ह्यातून बुधवारी दुपारपर्यंत केवळ चिंधे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular