Homeशहरमहानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस... कंत्राटी कामगारांकडून नगर शहराची स्वच्छता सुरू

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस… कंत्राटी कामगारांकडून नगर शहराची स्वच्छता सुरू

advertisement

अहमदनगर दि.3 ऑक्टोबर

अहमदनगर महानगरपालिकेचे कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबई येथे मंत्रालयावर धडकण्यासाठी सोमवारी सकाळी निघले होते. त्यामुळे आता शहरातील महानगरपालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले असून याचा सर्वप्रथम फटका स्वच्छतेला बसला होता. नुकतीच शहरामध्ये ईद साजरी झाली असल्यामुळे ज्या रस्त्यांवरून ही मिरवणूक केली त्या ठिकाणी प्रचंड कचरा जमा झाला होता मात्र महानगरपालिकेचे सफाई करणारे कर्मचारी सुद्धा आंदोलनात सहभागी झाल्याने शहरात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले होते. यावर तोडगा म्हणून आता महानगरपालिका आयुक्तांनी थेट कंत्राटी कामगार बोलवून शहरात स्वच्छता सुरू केली आहे शहरातील विविध भागात कंत्राटी कामगारांद्वारे ही स्वच्छता सुरू झाली आहे.

जर कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला नाही तर पर्यायी व्यवस्था म्हणून कंत्राटी कामगार भरून काम सुरू केले जाईल असा इशारा या आधीच महानगरपालिका आयुक्तांनी दिला होता त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या संपाचा हा दुसरा दिवस असून त्यांची उणीव भासू नये म्हणून शहराची स्वच्छता कंत्राटी कामगारांकडून सुरू आहे.

अहमदनगर महानगरपालिकेच्या संपामध्ये आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आणि पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी वगळता सर्वच विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे आता आजपासून अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर त्याचा परिणाम जाणून लागेल नगरकरांची कामे आधीच उशिरा होतात त्यामध्ये आता संपामुळे ही कामे पुन्हा उशिरा होतील त्यामुळे नागरिकांमधून आता संताप व्यक्त होऊ लागला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular