अहमदनगर दि.६ जुलै
अहमदनगर शहरातील औरंगाबाद रस्त्यावरी पोलिस अधीक्षक निवासस्थानाजवळ बांधण्यात आलेल्या दिलासा हॉल सभागृहाच्या बेकायदा बांधकामाबाबत राज्याच्या पोलिस महासंचालकां. यांनी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे
या प्रकरणी नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीरभाई शेख यांनी गृह विभागाकडेया दोन मार्च 2021 रोजी तक्रार केली होती.
या प्रकरणाबाबतची माहिती अशी की, 2019 मध्ये पोलिसांच्यादिलासा सेल कार्यालयालगत अनधिकृतपणे अवैध मार्गाने जमवलेल्या निधीतून हॉलचे(सभागृह) बांधकाम केलेले आहे व त्याची चौकशी होऊन कारवाई करण्यास होतअसलेल्या दिरंगाईबाबत तक्रारदार शाकीरभाई शेख यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसेपाटील यांच्याकडे 9 ऑगस्ट 2021 रोजी तक्रार केली होती. त्याआधीत्यांनी 2 मार्च 2021 रोजी अप्पर मुख्य गृहसचिवांकडेही तक्रार केली होती. गृह विभागाने 25 ऑक्टोबर 2021 रोजी पोलीस महासंचालक यांना अहवाल सादर करणे कामी आदेश करण्यात आले होते पोलीस महासंचालक यांच्याकडून चौकशी न करता नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे कार्यवाही करण्यासाठी पाठवण्यात आले होते बी जी शेखर यांनी 13 सप्टेंबर 2022 रोजी पोलीस अधीक्षक यांना अभिप्राय सादर करण्याचा कळवले मात्र सदरची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विरोधात असल्याने त्याची चौकशी पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकारी कडे देण्यात आली होती त्यांनी दिशाभूल करणारी चौकशी केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ येथे शेख यांनी याचिका दाखल केली होती १५ मार्च 2023 रोजी उच्च न्यायालयाने पोलीस महासंचालक यांना सदर प्रकरणी शपथपत्र दाखल करण्याचा निर्देश दिले होते तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या चौकशी अहवाल वर न्यायालयाने प्रश्नचिन्ह निर्माण केले होते संबंधित हॉल बांधताना कोणतीही कायदेशीर परवानगी घेतली गेली नाही वबांधकामासाठी सरकारी अनुदानाचाही वापर केला गेला नाही. तत्कालीन पोलिसअधीक्षक रंजनकुमार शर्मा, तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षकदिलीप पवार यांनी हे बेकायदा बांधकाम केलेव त्याची नोंद अहमदनगर महानगरपालिकेकडे आणि शासनाच्या सार्वजनिक बांधकामविभागाकडेही नसल्याचे माहिती अधिकाराद्वारे मिळालेल्या माहितीतून स्पष्ट झालेअसल्याचा दावा तक्रारदार शेख यांनी केला होता. तसेच या हॉल बांधकामाची परवानगीव बांधकाम खर्च याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयाकडेही उपलब्ध झाली नाही. त्यामुळे,सुमारे 30 ते 35 लाखाच्या खर्चातून झालेले हे बांधकाम झालेली आहे याबाबत पोलीस महासंचालक यांनी ३ जुलै 2023 रोजी याबाबत नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बीजी शेखर यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे शेखर यांनी सदर प्रकरणाची चौकशी सुरू केलेली असून तक्रारदार शेख यांना सात जुलै 2023 रोजी शिर्डी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयात चौकशी व जबाब नोंदण्या कामी विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे हजर राहण्याबाबत शेख यांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कळलेले आहे
दिलासा सेल प्रकरणी उच्च न्यायालयात 19 जुलै २०२३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.