Home क्राईम जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटवून घेणाऱ्या “त्या” युवकावर अखेर गुन्हा दाखल

जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वतःला पेटवून घेणाऱ्या “त्या” युवकावर अखेर गुन्हा दाखल

अहमदनगर दिनांक १९ मे
अहमदनगर शहरातील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पेट्रोल अंगावर ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या र ऋषिकेश विठ्ठल ढवाण वय 18 रा. बाभुळगाव ता. राहुरी याच्या विरोधात भिंगार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोहेकॉ. सचिन काशिनाथ डमाळे यांनी भिंगार पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दिली असून ऋषिकेश विठ्ठल ढवाण याने त्याच्यावर राहुरी पोलीस स्टेशन येथे खोटी केस केल्याच्या कारणावरुन स्वताःच्या अंगावर पेट्रोल ओतुन स्वताःला पेटुन घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याने त्याच्याविरोधात आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे भादवि क. 309, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्हाच तापस भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शना खालीपोहेकॉ गौर्ड करत आहे.

बुधवारी सकाळी न्यायालयाचे कामकाज सुरू झाल्यानंतर ऋषिकेश गाणे जिल्हा न्यायालयातील दुचाकी वाहन पार्किंगच्या शेजारी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला होता यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी माती यांनी धाडा पाल्याच्या सहाय्याने ऋषिकेश च्या अंगाला लागलेली आग विझली होती त्यानंतर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी त्यास पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती समजते

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version