Home शहर सभासदांनो घाबरू नका ! बँकेचे कुठलेही आर्थीक नुकसान नाही बँक भक्कम स्थितीत...

सभासदांनो घाबरू नका ! बँकेचे कुठलेही आर्थीक नुकसान नाही बँक भक्कम स्थितीत उभी. अहमदनगर शहर सहकारी बँकेचे आवहान

अहमदनगर  दि.२२ सप्टेंबर-

अहमदनगर शहर सहकारी बँकेच्या खातेदार, ठेवीदार कर्जदार व तमाम सभासद बंधुनो आपण सध्या चालू असलेल्या वर्तमानपत्रातील बातम्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थीतीला अजिबात घाबरून जाऊ नका किंवा गोंधळून जाऊ नका, कोणीही आपणास खोटे नाटे
बँकेबद्दल सांगण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण शांतपणे विचार करा की, सध्या घडलेल्या सोनेतारण प्रकरणात झालेल्या अफरातफरी या पोलीसांच्या सहकार्याने व बँक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सतर्कतेने उघडकीस येऊन गोल्ड व्हॅल्युअरसह इतर आरोपीना पोलीसांनी ताब्यात घेतले असुन सदर प्रकरणात पोलीस कारवाईसह बँकेची या प्रकरणातील रकमेची वसुली देखील होत आहे.

गोल्ड व्हॅल्युअरचा बँकेशी असलेल्या कायदेशीर करारानुसार नुकसानीची रक्कम त्याला बँकेत भरावी लागते त्यामुळे बँकेची कुठलीही आर्थीक नुकसान होत नसते व होणार नाही असा खुलासा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नितीन चितळे यांनी केला. या पुर्वीही बँकेवर अशा प्रकारचे संकटे आणली गेली आहेत. परंतु आपल्या सभासदांचे पाठबळावर व आशीर्वादाने केवळ बँकेची खोटी बदनामी सोडून आजतगायत एक रूपायाचेही आर्थिक नुकसान झालेले नाही व भविष्यातही आम्ही होऊ देणारच नाही.

आपल्या बँकेची वार्षिक, आर्थीक उलाढाल ही २७ हजार ते ३० हजार कोटीपर्यंत असुन सर्व निकष उत्तम आहेत. केवळ थकबाकी हा मुद्या थोडासा होता. आता ते ३ वर्षानंतर कोर्ट कामकाज नियमितपणे व सुरळीतपणे चालु झाल्याने तोही प्रश्न आम्ही सर्व मिळुन निश्चीतपणे सोडवुन आपल्या बँकेस पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणारच आहोत म्हणुन विनंती की, कोणी काहीही खरे खोटे सांगुन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्यांची अजिबात दखल घेऊ नये. अशी कळकळीची विनंती जेष्ठ संचालक सीए गिरिश घैसास व अध्यक्ष सुभाष गुंदेचा यांनी केली आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version