पुणे दि.२२ ऑगस्ट
महाराष्ट्र सह देशभरात आज सकाळपासूनच पीएफआय या संघटनेच्या कार्यालयांवर एन आय ए आणि एटीएस यांनी विविध ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे.
पुण्यातील कोंढवा भागातून अब्दुल शेख रजी अहमद खान या दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पुण्यासह मुंबई ,नवी मुंबई आणि भिवंडीतही ही कारवाई आज सकाळी करण्यात आले आहे पी एफ आय च्या कार्यालयावर छापेमारी करून ही कारवाई करण्यात आली आहे.या संघटने कडून दहशतवादी कारवायांसाठी पैसा पुरवला जातो हा पैसा कुठून येतो आणि कोणा मार्फत येतो कोणत्या माध्यमातून येतो याबाबत आता एन आय ए तपास करणार आहेत .महाराष्ट्रात मुंबई नवी मुंबई पुण्याचा कोंढवा परिसर भिवंडी आणि ठाणे औरंगाबाद कोल्हापूर बीड नांदेड जळगाव जालना मालेगाव येथे देखील छापे पडले आहेत.
महाराष्ट्रात जवळपास 20 ठिकाणी छापे पडले असून महाराष्ट्रासह कर्नाटक तामिळनाडू आणि असाम मध्येही छापेमारी झाली असल्याची खात्रीशीर माहिती हाती येत आहे कर्नाटक मधून वीस आरोपींना ताब्यात घेतले आहे आंध्र प्रदेश मधून पाच आरोपींना तर दिल्ली मधून तीन तर आसाम मधून नऊ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे.आतापर्यंत देशभरातनं 106 लोकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.