Home क्राईम नेवासा फाटा परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा;सात पीडित...

नेवासा फाटा परिसरात एकाच वेळी तीन ठिकाणी हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर छापा;सात पीडित परप्रांतीय मुलींची सुटका ,डीवायएसपी संदीप मिटके यांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

अहमदनगर दि.२१ सप्टेंबर
नगर औरंगाबाद रोडवरील नेवासा फाटा परिसरात काही हॉटेल मध्ये सेक्स रॉकेट चालवून बळजबरीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती डीवायएसपी संदीप मिटके यांना मिळाली होती या प्रकरणाची खात्री करून घेतल्यानंतर डीएसपी संदीप मिटके आणि त्यांच्या पथकाने नेवासा फाटा परिसरातील
हॉटेल पायल,हॉटेल नामगंगा,व हॉटेल तिरंगा या ठिकाणी
पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि त्यानंतर या तीनही हॉटेलवर नियोजनबद्ध एकाच वेळी छापा टाकून सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी संदीप मिटके , पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, पोलीस निरीक्षक करे ,पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सायक पोलीस निरीक्षक मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version