Homeशहरप्लॉटच्या व्यवहारावरून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

प्लॉटच्या व्यवहारावरून डॉक्टरवर जीवघेणा हल्ला

advertisement

अहमदनगर दि.१७ ऑगस्ट
अहमदनगर शहरातील सारस नगर परिसरातील एका प्रतिष्ठित डॉक्टरवर खुनी हल्ला केल्याची घटना आज सकाळच्या दरम्यान घडली आहे. डॉक्टर हे नेहमीप्रमाणे सकाळी व्यायामासाठी बाहेर पडले असताना एका व्यक्तीने त्यांच्यावर खुनी हल्ला केला मात्र डॉक्टरांच्या लक्षात ही घटना आल्यामुळे त्यांनी आपला बचाव करत त्या हल्ले खोरास कडाडून विरोध केल्यामुळे डॉक्टरांवर हातावर आणि मानेवर जखम झाली आहे. तर त्या हल्ले खोराने एक स्प्रे ही डॉक्टरांच्या तोंडावर मारण्यासाठी आणला होता डॉक्टरांची आणि हल्लेखोराची झटपट पाहून इतर लोकांनी डॉक्टरांच्या मदतीला धावले आणि त्या हल्लेखोरास पकडले.

एका प्लॉटच्या व्यवहारावरून हा प्रकार घडला असल्याची तक्रार त्या डॉक्टरांनी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असून यावरून एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


प्लॉटच्या ताब्यावरून नगर शहरात खुनी हल्ले होण्याची घटना आता नगरकरांना नवीन नाही प्लॉटचे भाव प्रचंड वाढले असल्याने अनेक ठिकाणी ताब्यावरूनही मर्डर झाल्याच्या घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा प्लॉटच्या व्यवहारावरूनच एका डॉक्टरवर खुनी हल्ला झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

तर केडगाव मधील काही प्राध्यापकांनाही अशाच प्रकारे त्रास दिला जात असून या बाबत सर्व लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. मात्र सध्या त्या प्रकरणाची चौकशी सुरू असून केडगाव मध्ये पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण सुरू झाले का काय असाच प्रश्न आता समोर येऊ लागला आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular