Home विशेष आगळा वेगळा वाढदिवस जो आपण कधी पाहिलाही नसेल..जिल्हाधिकारी कार्यालय समोर पक्या भाई...

आगळा वेगळा वाढदिवस जो आपण कधी पाहिलाही नसेल..जिल्हाधिकारी कार्यालय समोर पक्या भाई चा वाढदिवस जोरात साजरा

बीड दि.१६ मे

बीड सध्याचे वातावरण जर पाहायला गेलं वाढदिवसांचे तर नेत्यांचा वाढदिवस किंवा युवा नेते यांचा वाढदिवस करताना मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी जिल्हाभरात केले जाते मात्र या बॅनरबाजी मुळे जिल्ह्यातील रस्त्यावर कोणकोणत्या अडचणी चा सामना जनतेला करावा लागतो हे मात्र त्या युवा नेत्यांना किंवा नेत्यांना कळत नाही या गोष्टीचा निषेध करत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी पक्या भाई चा वाढदिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाच्या स्वरूपात साजरा केला.

दिवसेंदिवस वाढदिवसाचे फॅड हे तरुणाईमध्ये वाढताना पाहायला मिळते मात्र हे वाढदिवस साजरे करताना मोठ्या प्रमाणात शहरात बॅनरबाजी केली जाते आणि या बॅनरबाजी मुळे अनेक चौकांमध्ये ट्रॅफिकचा सामना जनतेला करावा लागतो यामध्ये बॅनर मुळे अनेक अपघात देखील झालेले पाहायला मिळतात मात्र याकडे शासन प्रशासनाचा कसल्याही पद्धतीचं लक्ष नाही आणि या बॅनरबाजी मुळे होणारे अपघात याकडे ही कोणी दखल घेत नसल्याचे पाहून सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे आणि अनेक कार्यकर्त्यांनी मिळून एक श्वानाचा पक्या भाई म्हणून बर्थडे साजरा केला आणि ह्या बर्थडे चे बॅनर देखील त्यांनी छापले होते हा वाढदिवस बघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय समोर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली

मात्र हे गांधीगिरीचा आंदोलन या युवा नेत्यांना युवा पिढीला कळणार का…? शासन-प्रशासन नगरपालिका या गांधीच्या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद देणार हे देखील आता पाहणे गरजेचे आहे मात्र या पक्या भाई च्या वाढदिवसाने जिल्हाभरात एक वेगळीच चर्चेला उधाण आलेले पाहायला मिळालं हे बॅनर बाजी करताना हे युवक कोणत्याही पद्धतीचे परवानगी न घेता हे बॅनरबाजी करत असल्याचा आरोप देखील याठिकाणी गणेश ढवळे यांनी केला आहे .

पहा व्हिडीओ श्वानाचा वाढदिवस कसा साजरा केला

अनेक नेत्यांचे जर वाढदिवस साजरे करायचे म्हणलं की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होल्डिंग्स बॅनर आणि फटाक्यांची आतिषबाजी केली जाते मात्र यामध्ये जनतेला काय त्रास होतो हा देखील यामध्ये पाहिला जात नाही मात्र हा वाढदिवस साजरा करणं हेच एक हेतू असतं आणि ते साध्य करतात मात्र यामध्ये बॅनर आणि चौकात लावल्यामुळे ट्राफिक आणि ट्राफिक मुळे होणारे अपघात हे मात्र सत्य नाकारता येत नाही आता या अनोख्या गांधीगिरीचा आंदोलनानंतर प्रशासन कशा पद्धतीने ह्या बॅनरबाजीला रोखणार हे देखील आता पाहणे गरजेचे आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version