Home राज्य नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निलंबित करा अन्यथा आंदोलन...

नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना निलंबित करा अन्यथा आंदोलन करणार – आ. गोपीचंद पडळकर यांचा ईशारा

नेवासा दि.१६ मे
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील अंतरवाली द्या गावातून एका मुलीचं अपहरण करण्यात आला असून शाम मे 2022 रोजी संबंधित मुलीच्या आई वडिलांनी नेवासे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन अपर्णा बाबत तक्रार दाखल केली होती मात्र या प्रकरणात मुलीचा शोध घेण्याऐवजी पोलिसांनी मुलीचा कुटुंबियांना त्रास देण्यात येत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

या बाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गोपीचंद पडळकर यांनी प्रसारमाध्यमातून विनंती केली आहे की अपहरण झालेल्या मुलीला त्वरित सुखरूप आई वडिलांच्या कडे सुपूर्द करण्याच्या कारवाईसाठी आदेश द्यावेत तसेच तात्काळ संबंधित पीआयला निलंबित करावे व मला आंदोलन करण्यास भाग पाडू नये. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुढे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाली तर याला जबाबदार आपणच राहाल असा इशाराही गोपीचंद पडळकर यांनी दिलाय .

तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या आई वडीलांनी ६ मे २०२२ रोजी तक्रार दाखल केल्यानंतर पीआय बाजीराव पोवार यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी आई वडीलांना अश्लील शिवीगाळ करित दमदाटी करत १ लाख पंचवीस हजार रूपये वसूल केले असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

पहा व्हिडीओ

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version