अहमदनगर दि. ६ डिसेंबर
सुमारे सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणूकीच्या काळात घडलेल्या नगर तालुक्यातील पांगरमल विषारी दारूकांडाच्या गुन्ह्यात फरार असलेली संशयित आरोपी जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे हीचा जामीन मंजूर झाला असून अहमदनगर जिल्हा न्यायालयाचे जिल्हा सत्र न्यायाधीश गोसावी यांनी भाग्यश्री मोकाटे हिस जामीन मंजूर केला आहे.
भाग्यश्री मोकाटे हीस सहा वर्षानंतर सीआयडीने अटक केली होती.तेव्हापासून भाग्यश्री मोकाटे न्यायालयीन कोठडीमध्ये होती. सहा वर्षांपूर्वी 14 फेब्रुवारी 2017 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांसाठी आयोजित केलेल्या जेवणा प्रसंगी विषारी दारूचे सेवन केल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला होता.त्या मध्ये दोघांना अंधत्व आले तर एक अपंग झाला होता या दारूकांडात एकूण 15 जणांचा मृत्यू झाला, मात्र या नऊ जणांच्या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात तर इतरांच्या मृत्यूचा नंतर उलगडा झाल्याने नगर तालुका व भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात झालेल्या गुन्ह्याचा तपासनंतर सीआयडी कडे वर्ग करण्यात आला या गुन्ह्यात मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात 20 जणांचा समावेश आहे. यातील राजेंद्र बबन बुगे याचा पसार असताना अपघाती तर मोहन दुग्गल याचा नाशिक कारागृहात मृत्यू झाला. काही संशयित आरोपींना उच्च न्यायालयाने जामीनही मंजूर केला आहे.
आज अहमदनगर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश गोसावी यांनी भाग्यश्री भाग्यश्री मोकाटे हीस काही अटी आणि शर्तीवर जामीन मंजूर केला आहे जामीन झाल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणे, तपासामध्ये पोलिसांना सहकार्य करणे तसेच साक्षीदारांवर दबाव आणू नये या अटी शर्तीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. भाग्यश्री मोकाटे यांच्यावतीने नगर जिल्ह्यातील प्रसिद्ध विधीज्ञ सतीश एस. गुगळे यांनी काम पाहिले.
भाग्यश्री मोकाटे यांच्यावतीने बाजू मांडताना सतीश गुगळे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की जेव्हा घटना घडली तेव्हा भाग्यश्री मोकाटे या वीस वर्षांच्या होत्या त्यामुळे त्यांचा आणि जेवण आयोजित करणाऱ्या नागरिकांचा प्रत्यक्षात काहीही संपर्क आलेला नव्हता तसेच याच प्रकरणातील मंगल आव्हाड यांनाही जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणाचा तपास २०१७ साली पूर्ण होऊन 2020 साली चार्जशीट दाखल झाले होते. मात्र पुढील तपासात भाग्यश्री मोकाटे यांच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा सीआयडीला तपासात मिळाला नव्हता त्यामुळे जामीन मंजूर करावा अशी बाजू मांडण्यात आली होती. सरासर गोष्टींचा विचार करून न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे.