अहमदनगर दि.७ डिसेंबर
नगर शहर आणि उपनगरांमध्ये आता मोकाट कुत्र्यांमुळे दिवसा फिरणे कठीण झाले आहे. रात्री अप
रात्री तर मोकाट कुत्र्यांमुळे संचारबंदीचे वातावरण असते.
अहमदनगर शहरातील विविध भागात दररोज ३० ते ४० जणांना मोकाट कुत्रे चावा घेत असून, महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार करतात
काय? असा सवाल करत येत्या १५ दिवसात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास महापालिकेच्या विरोधात
शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा युवा सेना राज्य सचिव विक्रम राठोड यांनी दिला आहे.
तारकपूर आणि रामचंद्र खुंट येथील लहान मुलांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतल्याची घटना घडली असून. विक्रम राठोड यांनी या मुलांना घेऊन थेट महापालिकेत आयुक्त डॉ. पंकज भेट घेतली आणि मोकाट कुत्र्यांमुळे दुखापत झालेल्या मुलांना त्यांच्यासमोर उभे करून वस्तुस्थिती दाखवून दिली.
अहमदनगर शहरात भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे यासाठी लाखो करोडो रुपयांचे खर्च महानगरपालिका करत आहे. मात्र या ठेकेदारावर अनेक गंभीर आरोप होऊन सुद्धा त्याच ठेकेदाराला पुन्हा पुन्हा निर्बिजीकरण करण्याचा ठेका दिला जातो. या आधी सुद्धा विक्रम राठोड यांनी शाडो पार्टनर म्हणून एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचा उल्लेख करत यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा आरोप केला होता. मात्र तरीही त्याच ठेकेदाराला पुन्हा ठेका दिला आहे. शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या कमी होत नाही तर रोज नवीन शेकडो पिल्ले जन्माला येत आहेत त्यामुळे मग ठेकेदार नेमकं करतोय काय असा सवाल उपस्थित होतोय.
अहमदनगर शहरातील नागरिकांचा पैसा अशा प्रकारे वाया जात असेल तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. की याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास हा फक्त काही भागापुरता नसून अहमदनगर शहरातील प्रत्येक भागांमध्ये भटक्या कुत्र्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ही भटकी कुत्रे उद्या आपल्याही कोणत्या नातेवाईकांना, मुलांना चाऊ शकतात त्यामुळे या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. महानगरपालिकेने तातडीने याबाबत ठोस कारवाई केली नाही तर भविष्यात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.