अहमदनगर दि.६ डिसेंबर
नगर शहरात सर्वत्र जुगार मटका ऑनलाईन लॉटरी, बिंगो , सट्टेबाजी, तसेच गांजा ,नशेचे पदार्थ,मावा,गुटखा,बंदी असलेली सुगंधी सुपारी,कॉफी हाऊस मध्ये हुक्का पार्लर, यामुळे तरुण वर्ग उध्दवस्त होवू लागला आहे. नगर शहरातील तोफखाना हद्दीत मात्र या सर्व गोष्टींना मुभा दिली असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
अवैध धंदे बंद करण्याबाबत नागरिकांनी ओरड
करुन देखील पोलिस प्रशासनाच्या कानापर्यंत तो
आवाज जात कसा नाही? हा मोठा संशयाचा विषय
ठरला आहे. पोलिस प्रशासनाला जनतेचा आवाज जात नाही कि स्वतःहून ते कान बंद करुन घेतात हा देखील संशोधनाचा विषय ठरत आहे. ना तपास ना जरब फक्त दिवस ढकलत जायचं असाच काहीसा प्रकार सध्या तोफखाना हद्दीत दिसून येत आहे.
रस्त्यावर वाढदिवस साजरे करणे तर तोफखाना हद्दीत रोजच असे प्रकार घडत आहेत कारण पोलिसांचा धाकच संपलेला दिसतोय. दिल्ली गेट पासून सावेडीला जोडणाऱ्या बालिकाश्रम रोड वर अनेक टवाळखोर महिला व मुलींचे छेड काढतात मात्र या ठिकाणी कधीच पोलीस फिरताना दिसत नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करूनही उपयोग नाही अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे
तर पंपिंग स्टेशन पासून कराळे हेल्पपर्यंत जो नवा रोड झालेला आहे त्या भागात तर रोजच 40 ते 50 टवाळखोरांचा धुडगूस रोज चालू असतो या ठिकाणी फिरायला येणाऱ्या आबालावृद्धांसह महिलांना यांचा त्रास होत असतो तर रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी अनेक नशेबाज सर्रास वावरत असतात मग पोलीस नेमकं कुठे गेलेत हा प्रश्न आता नागरिकांसमोर येऊ लागला आहे.
तपोवन रोड, पाईपलाईन रोड, गुलमोहर रोड भागातही अशीच परिस्थिती आहे.प्रत्येक चौकात रात्रीच्या वेळेस अनेक टोळके थांबलेले असतात आणि नशेबाजी तर सर्रास कुठेही सुरू असते त्यामुळे तोफखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांचा धाकच संपलेला दिसतोय.
अज्ञात कर्मचारी मोठ्या प्रमाणात हप्ते वसूल करण्यात
मग्न असून त्यांना त्यांच्या प्रमुख कर्तव्यांचा विसरच
पडला असल्याचे दिसतय. अवैध धंदे चालतात
ते वरिष्ठ कार्यालयापासून याची साखळी असते.
कारण त्यांनाही देखील हप्ता चालू असल्याने कुणीही
किती ओरड केली तरी अवैध धंदे बंद होणार नाही,
अशी चर्चा नगरकरांमध्ये सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त
केले जात असून तोफखाना पोलिसांच्या कार्यपध्दतीवर शंका उपस्थित होत आहे. अवैध धंद्याविरुध्द बोलल्यास गुंडप्रवृत्तीचे अवैध धंदे चालक पोलिसांच्या मदतीने दमदाटी करतात असा देखील आरोप होत आहे.अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यावर काय भूमिका घेतात हे बघणे आता महत्त्वाचे ठरेल.