नगर दिनांक 3 सप्टेंबर
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर अहिल्यानगर महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली असून.या मुळे आता इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागणार आहेत. सायंकाळी पाच वाजून 19 मिनिटांनी महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी अधिकृत प्रभाग रचना जाहीर केली. त्यानंतर काही वेळातच महानगरपालिकेचे माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दोनचा नकाशा नागरिकांच्या घराघरांमध्ये पोहोचला आहे. सर्वात प्रथम माजी नगरसेवक निखिल वारे यांनी आपल्या प्रभागाचा नकाशा नागरिकांचा घरापर्यंत पोहोचवण्यात बाजी मारली आहे.
शीलाविहार, छत्रपती संभाजी महाराज नगर महामार्ग, तपोवन रोड ते शिव रस्ता म्हणजेच गावडे मळा ,पाइपलाइन हडको,लेखा नगर,माऊली नगर,संचार नगर, गोकुळधाम सोसायटी,हा परिसर नव्याने समाविष्ट झाला आहे. तर पूर्वीचा प्रभाग आहे तसाच प्रभाग क्रमांक दोन मध्ये ठेवण्यात आला आहे. अनेक विकास कामे प्रभाग क्रमांक दोन मध्ये केल्यामुळे भारतीय जनता पार्टीचे निखिल वारे यांचे पारडे सध्या तरी जड आहे. या प्रभागात जवळपास 22 हजार 15 इतके मतदार असून. चार नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभाग रचना करण्यात आली आहे.