Home राजकारण केडगावात राजकीय भूकंप…त्या पोस्टर मुळे महायुतीमध्ये दरार आल्याचं स्पष्ट…

केडगावात राजकीय भूकंप…त्या पोस्टर मुळे महायुतीमध्ये दरार आल्याचं स्पष्ट…

Oplus_0

अहिल्यानगर दिनांक 29 डिसेंबर

अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक रोज एका दिवसाने जवळ येत असताना राजकारणात अनेक भूकंप आणि कार्यकर्त्यांना धक्के बसणारे निर्णय समोर येऊ लागले आहे. महायुतीतील घटक पक्ष असलेला शिवसेना शिंदे गट वेगळी भूमिका घेण्याची शक्यता असून आता इच्छुक उमेदवारांना शिवसेनेने संपर्क साधत उद्या अर्ज भरण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे शिवसेना महायुतीतून बाहेर पडला असे म्हणायला हरकत नसेल मात्र अद्याप तशी घोषणा झालेली नाही.

Oplus_131072

तर केडगाव मध्ये मोठा राष्ट्रीय भूकंप झाला असून एका सोशल मीडियावरील पोचणे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे शिवसेने मध्ये असलेल्या काही नगरसेवकांचे पोस्टर सोशल मीडियावर झळके असून यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून कमळाचे चिन्ह या पोस्टरवर टाकण्यात आले आहे त्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मधून भारतीय जनता पार्टीचे चार उमेदवार फिक्स झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version