अहिल्यानगर दिनांक 29डिसेंबर
अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली असून दोन दिवसानंतर पक्षांचे तिकिटे कोणाला मिळणार हे कळणार असले तरी अद्याप अनेक प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक उमेदवार असल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी जाहीर करणे टाळले आहे.

महायुती मध्ये फूट पडली असून शिवसेना आता वेगळी लढणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
तर स्वर्गीय माजी आमदार अनिल राठोड यांचे चिरंजीव आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे युवासेनेचे विक्रम राठोड यांनी धनुष्य बाण हाती घेतला असून विक्रम राठोड यांची नवी इनिंग जुन्या चिन्हावर सुरू होणार आहे.
विक्रम राठोड यांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता असून यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.