अहिल्यानगर
अहिल्यानगर महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असून आता दोन दिवसानंतर उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद होणार आहे.

प्रभाग क्रमांक तीन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा,मनसे,आणि अपक्ष उमेदवारांनी मोठी रंगत आणली असून चार प्रमुख पक्षांनी आपापले उमेदवार दिल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक तीन मधील अ भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे उषा नलवडे, शिवसेना शिंदे गटाचे शेळके चंद्रकांत,अपक्ष जयंत येलुलकर यांच्या मध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून निवडणूक चांगलीच घासून होणार आहे.भाजपाचे कमळ,शिवसेनेचा धनुष्यबाण आणि अपक्ष असलेल्या येलुलकर यांची कप बशी ची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.मात्र मतदानाच्या दिवशी होणारे मतदान आणि त्या नंतर येणारा निकालच सांगेल मतदार कोणाच्या पाठीशी उभे राहणार आहे.
तर दोन दिवसांपूर्वी शिवसेना उबाठाचे युवानेते विक्रम राठोड यांनी शिवसेने मध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित प्रवेश केला असून नगर मध्ये झालेल्या शिवसेनेच्या प्रचार सभेत त्यांनी धनुष्य बाणाच्या उमेदवारांना निवडून देण्याची विनंती मतदारांना केली तर दोन दिवसांपूर्वी त्यांनी मशाल विझली म्हणून पोस्ट केली होती.