Homeराजकारणमहायुतीतील निवडणुकीच्या समन्वयकाची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर.. तिन्ही पक्ष...

महायुतीतील निवडणुकीच्या समन्वयकाची जबाबदारी आमदार संग्राम जगताप यांच्यावर.. तिन्ही पक्ष आणि इतर मित्र पक्षांच्

advertisement

अहमदनगर दिनांक 20 मार्च
लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यातील नव्याने स्थापन झालेल्या महायुतीचे उमेदवार ही आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत.अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील मित्र पक्षांची तयारी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर लोकसभेची ही प्रथमच निवडणूक आहे. वेगळीच महायुती घेऊन उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचणार आहे.

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या समन्वयक पदाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यावर सोपवण्यात आली असून. लोकसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यामुळे आता इथून पुढच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजपा व शिवसेना तसेच महायुतीतील मित्रपक्ष यांच्यासह पालकमंत्री आजी-माजी आमदार,खासदार सर्व जिल्हाध्यक्ष व पक्षप्रमुख प्रमुख कार्यकर्ते यांच्याशी संपर्क करून पुढील सभा बैठक आणि प्रचाराचे नियोजन करण्यात साठी समन्वय करावा अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार संग्राम जगताप यांना दिल्या आहेत त्या दृष्टीने आता पुढील काळात निवडणुकीत महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular