HomeUncategorizedइलेक्शन मधील प्रचाराचे फंडे...कार्यकर्ते लागले कामाला... भाजपचे सुजय विखे यांचे चॉकलेट घराघरात...

इलेक्शन मधील प्रचाराचे फंडे…कार्यकर्ते लागले कामाला… भाजपचे सुजय विखे यांचे चॉकलेट घराघरात…

advertisement

अहमदनगर दि.२६ मार्च

देशात लोकसभेची निवडणूक लागली असून या निवडणुकी साठी सर्वच राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत. भाजपने बऱ्यापैकी आपल्या उमेदवार जाहीर केल्यामुळे ते उमेदवार आता प्रचाराला लागले असून प्रचारासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.


निवडणूक आली म्हणजे हवशे नवशे गवशे यांच्या सह विविध संघटना प्रादेशिक पक्ष यांच्याकडून उमेदवार जाहीर केले जातात. निवडणुकीत सोशल मीडियाच्या जोडीला पारंपरिक लोककलेतील ओव्या, भारुड, उखाण्यांचीही चलती सुरु होते.काही उमेदवार तर पथनाट्यातून ‘चला परिवर्तन घडवू या’ चा नारा देतील.

अहमदनगर दक्षिण मतदार संघात प्रमुख समजल्या जाणाऱ्या महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या मध्ये लढत होणार आहे. अद्याप तरी महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर केला नाही मात्र महायुतीकडून भाजपचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

सध्या सोशल मीडियावर खासदार सुजय विखे पाटील यांचे समर्थक विकासाच्या विविध व्हिडिओ क्लिप व्हायरल करून भाजपला पुन्हा एकदा मतदान करण्याचे आवाहन करत असतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून आता या वेळेस नवीन फंडा वापरला आहे. घराघरात चॉकलेट वाटप करण्यासाठी सध्या सुजय विखे पाटील यांचे छायाचित्र असलेले चॉकलेट बनवण्याचे काम युद्ध पातळी सुरू आहे. सोशल मीडियावर सध्या या चॉकलेटचा व्हिडिओ चांगलेच धुमाकूळ घालत आहे.

त्याच प्रमाणे गाजलेल्या चित्रपटांच्या गाण्यांच्या चालींवर मतदारांना साद घातली जाऊ शकते. तरुणाईची आवड लक्षात घेऊन उडत्या चालीच्या गीतांचीही चलती सुरु आहे. यामुळे आॅडिओ, व्हिडीओ रेकॉर्डिंग करणाऱ्या स्टुडिओवाल्यांचीही चांदी होणार आहे.

डॉ.सुजय विखे पाटील यांनी निवडणुकी आधीच अनेक ठिकाणी महिलांसाठी विविध मनोरंजक कार्यक्रम, हळदी-कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करुन मतदानाचे आवाहन करणे सुरु केले आहे. येथे उखाण्यांचीही रेलचेल सुरु आहे. ‘राव आले उन्हातून त्यांना देते सरबत, अमक्याला मत देते मला नाही करमत’ अशी मजेशीर उखाणेही आता ऐकू येतील. उखाण्यांमध्ये चिन्हांचा खुबीने वापर होऊ लागला आहे. खऱ्या अर्थाने अजून प्रचार सुरू होण्यास एक महिना उद्या असला तरी खासदार सुजय विखे पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमातून आपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. असेच म्हणता येईल जोपर्यंत समोर उमेदवार ठरवला जाणार नाही तोपर्यंत प्रचाराची रंगत वाढणार नाही जेव्हा महाविकास आघाडी कडून उमेदवार जाहीर होईल तेव्हा खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत येणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular