अ.नगर दिनांक 22 ऑक्टोबर
राज्याच्या विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबर रोजी होणार असून त्यासाठी आता सर्वच पक्षांकडून उमेदवारी देण्याची लगबग सुरू आहे मात्र काही जागेवर मतभेद असल्याने अद्यापही भाजप वगळता कोणत्याही पक्षाने उमेदवारी मोठ्या प्रमाणात जाहीर केलेल्या नाही यावर्षीच्या विधानसभेची लढत ही तुल्यबळ होणार असल्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवाराच्या सर्व बाजूंचा विचार करून उमेदवारी देत आहे त्यामुळे शेवटपर्यंत कोणाला उमेदवारी जाईल याबाबत संभ्रमच राहणार आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जागांचा पेच असून महायुती मधील घटक पक्ष असलेला भाजपने अहिल्यानगर जिल्ह्यातील चार जागांच्या उमेदवारांची नावाची घोषणा केली असली तरी अद्यापही शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी उमेदवारी जाहीर केली नसल्यामुळे अनेक ठिकाणी इच्छुक उमेदवार देव पाण्यात ठेवून आहेत.
आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस असून 29 ऑक्टोबर पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्यामुळे फक्त सहा दिवसांमध्ये ही मुदत संपणार आहे त्यामुळे आता सर्वच पक्षांना आपले उमेदवार जाहीर करावे लागणार आहेत. आज किंवा उद्या महाविकास आघाडीचे पहिली यादी जाहीर होऊ शकते अहिल्यानगर जिल्ह्यात महाविकास आघाडी कडून श्रीगोंदा मतदारसंघ आणि नगर शहर मतदारसंघ या जागेवरून वाटाघाटी सुरू असलेल्या मतभेदांमुळे नगर जिल्ह्यातील उमेदवारांची घोषणा करण्यात उशीर होत आहे. सुरुवातीला श्रीगोंदा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप यांचे नाव आघाडीवर होते खुद्द शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा असा आदेश देऊन ही जागा आपल्या पक्षाकडे राहणार असल्याचे सांगितलं होतं. तर याच ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपनेते साजन पाचपुते यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यामुळे या मतदारसंघावरून चांगलीच जुगलबंदी रंगली होती मात्र आता या मतदारसंघात चांगले ट्विस्ट आले असून साजन पाचपुते यांच्या ऐवजी अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांच्या नावाची चर्चा आता सुरू झाली असून जवळपास त्यांच्या नावावर महाविकास आघाडीतून त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे येथे माजी आमदार राहुल जगताप यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून ही जागा जर अनुराधा नागवडे यांच्या रूपाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटा कडे गेली तर अहमदनगर शहर मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडे आल्यानंतर या ठिकाणी तूतारी या चिन्हावरच उमेदवार लढू शकतो त्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला या ठिकाणी धक्काही बसू शकतो.
अहमदनगर शहर आणि श्रीगोंदा मतदारसंघामुळे इतर जागांच्या बाबतही अद्याप चर्चा झाली नसल्याने महाविकास आघाडी धक्का तंत्र वापरून उमेदवार जाहीर करू शकतात अशी ही माहिती सूत्रांकडून समजली आहे.
अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने संपूर्ण अहिल्यानगर मतदार संघातून दोन जागेसाठी आग्रह धरला आहे. नेवासा मतदारसंघ आणि अहमदनगर किंवा श्रीगोंदा मतदारसंघ या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने अग्रह धरला असला तरी आता वाटाघाटीत नगर शहर आणि श्रीगोंदा याबाबत अंतिम चर्चा सुरू असल्याचे कळतंय तर कर्जत जामखेड, शेवगाव, पाथर्डी,अकोले,राहुरी, पारनेर या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. तर कोपरगाव मतदार संघासाठी अद्यापही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता काही तासातच सर्व उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होण्याची शक्यता असून अनेक जणांना यामुळे धक्काही बसू शकतो. तर काँग्रेसला संगमनेर आणि श्रीरामपूर मतदारसंघ वाटा घाटी मध्ये मिळालेला आहे. अहमदनगर शहर मतदारसंघावरही काँग्रेसने दावा केला होता मात्र या ठिकाणी शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी मोठा आग्रह धरल्याने आता या दोघांपैकी एकाकडे हा मतदारसंघ जाऊ शकतो