अहमदनगर दि.३१ ऑक्टोबर
अहमदनगर शहरामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये मधून आरक्षण मिळावे या मागणी करता गेल्या सात दिवसांपासून नगर तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे तर गेल्या दोन दिवसांपासून चार मराठा कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसले आहेत उपोषण सुरू झाल्यापासून नगर शहरातील महानगरपालिकेचे नगरसेवक तसेच विविध संघटना सामाजिक कार्यकर्ते यांनी उपोषण स्थळी घेऊन मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरता पाठिंबा दर्शवला होता.
सोमवारी नगर शहरातील काँग्रेस पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी उपोषण स्थळी येऊन काँग्रेस पक्षाच्या वतीने मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला मात्र या ठिकाणी आलेल्या काँग्रेस पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याने आणि चितळे रोड वरील माजी नगरसेवक असलेल्या त्या नेत्याने आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट न केल्याने अखेर या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी त्या पदाधिकाऱ्यास तिथून जाण्यास सांगितले. एकीकडे दोन महिन्यांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून मोर्चात सामील झालेल्या त्या माजी नगरसेवकाने मराठा समाजाच्या उपोषण स्थळी येऊन पाठिंबा दर्शवला मात्र कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानुसार ओबीसी मधून आरक्षण मिळावे याकरता पाठिंबा द्यावा असे सांगितले असतानी त्याला नकार दर्शवल्याने अखेर त्या काँग्रेस पदाधिकाऱ्यास आणि माजी नगरसेवकास उपोषण स्थळापासून कार्यकर्त्यांनी निघून जाण्यास सांगितले त्यामुळे नगर शहरात हा एक चांगला चर्चेचा विषय झालाय.
मराठा समाजाबाबत कुणीही दुट्टप्पी धोरण स्वीकारेल त्याला अशाच प्रकारे उत्तर दिले जाईल असा इशाराही सकल मराठा समाजाने दिला आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता सर्वांनी पाठिंबा द्यावा मात्र या पाठिंबामध्ये कोणतीही दुट्टप्पी धोरण नसावे सर्व समाज आता आरक्षणा साठी एकवटला असून कोणत्याही दबावाला समाज बळी पडणार नाही त्यामुळे मराठ्यांची चेष्टा करण्याचा धंदा बंद करा आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता सर्वांनी पाठिंबा द्यावा अन्यथा कोणाचीही भिड भाड न ठेवता अशा दुटप्पी नेत्यांना त्यांची जागा समाज दाखवून देईल असा संदेशही यावेळी देण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील माजी नगरसेवक धनंजय जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर भाजपा ओबीसी सेलचे ज्ञानेश्वर काळे तसेच शिवसेना नेते संदीप दातरंगे यांनी उघड भूमिका घेऊन मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे. सर्व गोष्टींना मराठा समाज आपल्या बरोबरीने लागत असताना मग आरक्षणामध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये येण्यास का विरोध केला जातो असा सवाल संदीप दातरंगे यांनी केला होता त्यामुळे या भूमिकेचे सर्व मराठा समाजातून स्वागत होत असताना त्या माजी नगरसेवकाने ओबीसी मधून आरक्षण मिळावे अशी मागणी आपल्या तोंडून केली नाही तर उलट मराठा समाजाच्या विरोधात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये म्हणून मोर्चामध्ये सामील होऊन जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते त्यामुळे अशा दुटप्पी नगरसेवकाला मराठा समाजाने जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे भविष्यकाळात अशी भूमिका घेऊन कोणीही आंदोलनासोळी भेट देऊ नये असा संदेश या ठिकाणी देण्यात आला आहे.