अहमदनगर – दि.३१ ऑक्टोबर
गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळाले पाहिजे. मराठा समाजातील अनेक घटक आजही वंचित आहेत. यामुळे मनोज जरांगे पाटलांची जी भूमिका आहे की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या भूमिकेला माझा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे यांनी केले आहे.
झिंजे म्हणाले की, जरांगे पाटलांच्या उपोषणाचा सातवा दिवस सुरू आहे. त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा बिघडलेली आहे. त्यामुळे लवकरात लवकर मराठा समाज बांधवांची मागणी मान्य करून सरकारने तात्काळ ओबीसीतून टिकणारे आरक्षण मराठा समाजाला देण्याची घोषणा सरकारच्या वतीने करावी अशी मागणी झिंजे यांनी केली आहे.