अहमदनगर दि.१५ जानेवारी
एमआयडीसी परिसरात शेंडी बायपास रोड वर दत्त मंदिर कमानी जवळ झालेल्या हाणामारीत एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी सुरुवातीला विळद घाट येथील विठ्ठलराव विखे पाटील दवाखान्यात नेण्यात आले होते मात्र पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याची खात्रीशीर माहिती मिळत असून मारहाण झालेल्या युवकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. मागील भांडणाच्या रागातून ऐन संक्रांतीच्या दिवशीच ही हाणामारी झाली आहे.
शुभम सोनवणे असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शुभम हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता.