Homeजिल्हाचलो मुंबई.... मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यातून जाण्याचा मार्ग...

चलो मुंबई…. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यातून जाण्याचा मार्ग ठरला..जेवण पाणी लाईटची व्यावस्था..अहमदनगर जिल्ह्यातील मराठा बांधव करणार..

advertisement

अहमदनगर दि.१६ जानेवारी
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या मागणी करता आता आरपारची लढाई सुरू असून मुंबई मधील आझाद मैदानावर मनोज जरांगे हे आमरण उपोषणाला बसणार आहेत.

वीस जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी येथून पायी मुंबई कडे जाण्यास निघणार आहेत.२१ जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश होणार असून पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथे दुपारचे भोजन होणार आहे. तर रात्रीचा मुक्काम नगर पाथर्डी रोडवरील बाराबाभळी येथे होणार आहे.बावीस जानेवारी रोजी सुपा मार्गे पुढे रांजणगाव येथे मुक्कामाला जाणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील सर्व बांधव पायी जाणाऱ्या दिंडीतील मराठा बांधवांची सेवा करणार आहेत.जेवण, पाणी आणि लाईटची सोय करण्यासाठी विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून जिल्ह्यातील सर्वच मराठा बांधव बाहेर जिल्ह्यातून आलेल्या बांधवांची सेवा करण्यासाठी अहमदनगर मध्ये दाखल होणार आहेत.

जवळपास पाच ते सहा लाख पाण्याच्या बॉटल तसेच पंचवीस लाखाच्या आसपास लोकांच्या जेवणाची सोय अहमदनगर जिल्ह्यातील मराठा बांधव करणार असून मराठा बांधवांसह इतर समाजातील बांधव या सेवेला प्रतिसाद देत असून जे बांधव पायी चालणार आहेत त्यांना त्रास झाला तर औषध उपचारासाठी अहमदनगर मेडिकल असोसिएशन तर्फे उपचार साहित्य देण्यात येणार आहे अशी माहिती दत्ता गाडळकर यांनी दिली आहे. तर माजी नगरसेवक धनंजय जाधव हे सुद्धा मराठा बांधवांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार आहेत.भुजबळ नावाच्या शेतकऱ्याने आपली जामीन पार्किंग साठी उपलब्ध करून दिली आहे. मुस्लिम बांधवांतर्फे बाराबाभळी येथे पाण्याची आणि राहण्याची सोय करण्यात येणार आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील दानशुर व्यक्तींनी आपापल्या परीने आरक्षणासाठी निघालेल्या पायी दिंडीतील लोकांना मदत करावी असे आवाहन गोरख दळवी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

गोरख दळवी, राम जरांगे,मदन आढाव, गजेंद्र दांगट, आदींसह मराठा समाजाचे कार्यकर्ते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

पायी दिंडी जाणाऱ्या मराठा बांधवांची व्यवस्था करण्यासाठी बनवण्यात आलेल्या विविध कमिट्या आणि त्यांचे संपर्क नंबर खालील प्रमाणे

*१.जेवण व्यवस्था कमिटी* –
दांगट भाऊसाहेब-9823232321
गिरीश भांबरे-7507877778

*२.पाणी टँकर्स व्यवस्था*-
सिद्धार्थ पानसरे-9604298289
सुधीर दुसुंगे -9922573325

*३.पिण्याचे पाणी व्यवस्था* –
स्वप्नील दगडे-9011855555
परमेश्वर पाटील- 9822479579

*४.लाईट व्यवस्था* –
राम जरांगे-9922240122

*५.स्वयंसेवक निवड कमिटी*
भाग्येश सवासे -9657999974
अनिकेत आवारे-7028064007
तुकाराम कदम-7020581330

*६.प्रसिद्धी कमिटी*-
राम जरांगे-9922240122
संदीप जगताप-9270866585
विलास तळेकर-8975654334
मिलिंद जपे -9226926893

*७.मेडिकल आणि डॉक्टर* –
दत्ताभाऊ वाबळे-9890908001
प्रशांत ठुबे-9822269697
शरदभाऊ डोंगरे-9822679420
वैभव वाघ-9623892040
डॉ.ध.वारे-
डॉ.

*८.पार्किंग नियोजन कमिटी*
अभय शेंडगे-9923545601
दत्ताभाऊ वामन-72018009595
काळे साहेब-8421840900

*प्रशासन कमिटी*
1. राम जरांगे
2. गोरख दळवी
3. मदन आढाव
4. मिलिंद जपे

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular