Home Uncategorized मलई बर्फी खाल्ल्याने झाला त्रास पाईपलाईन रोड वरील त्या मिठाई दुकानाची अन्न...

मलई बर्फी खाल्ल्याने झाला त्रास पाईपलाईन रोड वरील त्या मिठाई दुकानाची अन्न औषध विभागाचे अधिकारी करताहेत तपासणी

अहमदनगर दि.१३ ऑक्टोबर

दिवाळीच्या धामधुमीत मिठाई जास्त विक्री होत असते मात्र या काळात अनेक ठिकाणी बनावट पदार्थांपासून बनवलेली मिठाई विक्री होत असते. दरवर्षी अन्न औषध विभाग दूध खवा तसेच पावडर मिश्रित पदार्थ बनविणाऱ्यावर छापे टाकून कारवाई करत असतात. दिवाळीला मिठाईची मोठी मागणी असते मात्र मिठाई दुग्धजन्य पदार्थांपासून बनवण्यात येत असल्याने ती जास्त काळ टिकत नाही. मात्र त्यावर काही प्रक्रिया करून पुन्हा पुन्हा तेच पदार्थ मिठाई मध्ये वापरण्यात येण्यामुळे विषबाधा होऊ शकते.

अहमदनगर शहरातील पाईपलाईन रोडवरील एका प्रसिद्ध मिठाईच्या दुकानातून अभिजीत दरेकर यांनी मललई बर्फी घेऊन गेले होते. मात्र घरी गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी हि बर्फी घाल्यानंतर अचानकपणे रात्री कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना उलटी आणि जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते.दरेकर यांनी आणलेल्या मलई बर्फीचा वास येत असून याबाबत त्यांनी त्या दुकानदाराकडे याबाबत तक्रार करण्यासाठी गेल्यास दुकानदाराने अरेरावीची भाषा वापरली होती. मात्र या प्रकरणी आता अभिजीतरकर यांनी अन्न औषध प्रशासन कडे तक्रार केली असून अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी शरद पवार यांनी या पाईपलाईन रोडवरील मिठाईच्या दुकानात येऊन दुकानाची तपासणी सुरू केली आहे. तसेच अभिजीत दरेकर यांनी घेतलेली मलई बर्फी अन्न औषध प्रशासनाने ताब्यात घेतली असून अन्न औषध प्रशासनासचे अधिकारी कायदेशीर कारवाई साठी दुकानाची तपासणी करत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version