Home क्राईम बनावट एनओसी प्रकरण – राजसिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल नंतर तिसरा विनय...

बनावट एनओसी प्रकरण – राजसिंग ठाकूर आणि रोहित धेंडवाल नंतर तिसरा विनय अखेर पोलिसांच्या ताब्यात

अहमदनगर दि.१२ ऑक्टोबर

बनावट एनओसी प्रकरणी आता तिसरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला असून पोलिसांना रोहित धेंडवाल याची पोलीस रिमांड आज संपत असताना हा तिसरा आरोपी मिळाला आहे. तिसरा विनय दत्तात्रय वराडे (वय ६३,रा. भिंगार) याला पोलिसांनी मंगळवारी भिंगारमधून ताब्यात घेतले. या प्रकरणातील हा महत्त्वाचा दुवा असून तो एनओसीच्या आवक-जावकची नोंद ठेवत होता, असे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

हा तपास अहमदनगर शहराचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक समधान सोळुंके हे करत आहेत.

विनय दत्तात्रय वराडे हा सरंक्षण तत्कालीन लिपिक होता तो सध्या सेवानिवृत्त असून त्याच्याकडे आवक जावक नोंदवही चे काम करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून यात रोहन धेंडवालची आई सहभागी असल्याची माहितीही पोलिसांना मिळली आहे.बनावट एनओसी बनविणारा लॅपटॉप हा रोहनच्या आई कडे असल्याची शक्यता असून पोलीस तिचा तापस करत आहे.

तर या प्रकरणात एजंटचा महत्वाचा सहभाग आहे मात्र एका एजंटची चौकशी करून त्याला सोडून देण्यात आले होते त्याचे पुढे काय हा प्रश्न उपस्थित होतोय सरंक्षण खात्यातील आरोपी मिळाले मात्र यातील प्रांत कार्यालया कडे घेऊन जाणारे एजंट कुठे गायब आहेत त्यांची चौकशी करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शाकिर शेख यांनी पोलिसांकडे केली आहे

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version