अहमदनगर दि. 29 सप्टेंबर
13 मार्च 2020 रोजी नगर शहारत कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता.कोरोना संसर्गाचा आजार एका रुग्णापासून सुरू झाला होता तो आकडा आता पुन्हा शून्य वर आला आहे. या एका रुग्णापासून सुरू झालेल्या अकड्या पासून ते हजारो लाखो रुग्णांपर्यंत गेलेला आकडा अनेक लोकांनी आपले जवळचे नातेवाईक मित्र या मधल्या काळात गमावले आणि आता पुन्हा एकदा शून्याकडे वाटचाल होत असतानाचा आजचा दिवस.
अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा आकडा आज शून्य आला असून कोरोना आता जवळपास हद्दपार झाल्याचं दिसून येत आहे. दोन वर्षांपूर्वी या कोरोनामुळे संपूर्ण जग ठप्प झाले होते. जगातील अर्थव्यवस्था मोडकळीस येण्याची शक्यता निर्माण होत असताना पुन्हा एकदा संपूर्ण जगाने या कोरोनावर मात करून भरारी घेतली आहे. अहमदनगर जिल्ह्यात आज प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार बाहेरून आलेल्या आंतर जिल्ह्यातुन आलेला फक्त एकच रुग्ण आढळला असून अहमदनगर जिल्ह्यातील 14 तालुक्यात शून्य रुग्ण आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हा किमान आज तरी संपूर्ण पूर्ण मुक्त झाल्याचं दिसून येतोय.