Home Uncategorized चहाचे पैसे मागितले टपरी चालकावर तिघांनी केले चाकूने वार एक जण म्हणाला...

चहाचे पैसे मागितले टपरी चालकावर तिघांनी केले चाकूने वार एक जण म्हणाला माझं नाव स्वप्निल आहे

अहमदनगर दि.२९ सप्टेंबर

मिसळ वडा पाव दिला नाही म्हणून एका खाद्यपदार्थ विकारणाऱ्या चालकावर चाकूने हल्ला झाल्याची घटना
नगर पुणे रोडवरील केडगाव चौकात घडली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

गणेश रावसाहेब धरम या तरूणावर चाकुने तिघांनी हल्ला केला आहे.सोमवार दिनांक २६ सप्टेंबरला मध्यरात्री ही घटना घडली होती गणेश धरमच्या जबाबावरून तिघांविरूद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात भा द वी कलम  323 324 504 506 34 नुसार तीन अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश धरम हा रात्री आपली खाद्यपदार्थची गाडी बंद करून झोपला होता रात्री अडीचच्या सुमारास तीन जण चारचाकी गाडीतून टपरीजवळ आले आणि त्यांनी गणेश याच्याकडे खाण्यासाठी काय आहे असे विचारल्या नंतर गणेश याने चहा आणि क्रिमरोल असल्याचे सांगितले. त्या वेळी चारचाकी मधून आलेल्या लोकांनी मिसळ, वडापावची मागणी केली मात्र मध्यरात्री झाल्याने ती उपलब्ध होऊ शकत नाही हे उत्तर गणेशने दिल्याने मी स्वप्निल शिंदे असल्याचे गाडी मधून आलेल्या एकाने गणेशाला सांगितले.आणि क्रीमरोल चहाच्या बिलाची मागणी केली असता त्या तिघांनी चाकूने गणेशवर हल्ला केला. हल्ल्यानंतर आरोपी तेथून पळून गेले.

या प्रकरणाचा तपास कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पिंगळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर पालवे करत आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version