.अहमदनगर दि.२९ सप्टेंबर
अहमदनगर शिवसेनेतील एक मोठा चेहरा आणि अनेक गेल्या वर्षापासून राजकारणापासून दूर असलेले बाबु कामलात उर्फ बाबुशेट टायरवाले यांनी उद्धव ठाकरे सेनेला राम राम ठोकून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे त्यांच्यावर अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबई येथे नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बाबुशेठ टायरवाले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे संपर्कप्रमुख सचिन जाधव शहर प्रमुख दिलीप सातपुते उपस्थित होते. राहुरी, शेवगाव, कर्जत, जामखेड या तालुक्यांची जबाबदारी बाबुशेठ टायरवाले यांच्याकडे देण्यात आले असून बाबुशेठ टायरवाले हे पूर्व सर्वे पासूनच शिवसैनिक होते शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात स्व.जगदीश भोसले,स्व. अनिल राठोड यांच्याबरोबर त्यांनी काम केले होते. अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा होता मात्र काही काळापासून ते राजकारणापासून अलिप्त होते. कधी मधी शिवसेना अथवा भाजपच्या कार्यक्रमात ते दिसून येत असले तरी सक्रिय राजकारणापासून त्यांनी अलिप्त धोरण राबवले होते. मात्र पुन्हा आता त्यांना एकनाथ शिंदे गटाकडून दक्षिण जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आल्यामुळे शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत.