HomeUncategorizedधक्कादायक.. एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबलेला कामगार सापडला......

धक्कादायक.. एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत हातपाय बांधून तोंडात बोळा कोंबलेला कामगार सापडला… तो बोलल्यानंतरच ते गुढ उकलणार….

advertisement

अहमदनगर दिनांक 4 मार्च
अहमदनगर शहराला गच्च असलेल्या एमआयडीसी मधील एका नामांकित कंपनीमध्ये एक धक्कादाय प्रकार उघडकीस आला असून. कंपनीमध्ये कामावर असलेल्या कामगारास बांधून एका अडगळीच्या ठिकाणी ठेवले असल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र ही घटना नेमकी कशामुळे घडली कोणी घडवली याबाबत आता उलट सुलट चर्चा सुरू आहे.

एक कामगार रात्री 11 वाजता कामावर गेल्यानंतर सकाळी सात वाजता त्याची ड्युटी संपत असते त्याला घरी जाण्यास जवळपास एक ते दीड तास लागतो मात्र अकरा अजून गेले तरी आपला मुलगा घरी परत आला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याची शोधा शोध सुरू केली. अखेर कंपनीतील विविध भागात शोधाशोध केल्यानंतर कंपनीतील एका ठिकाणी तो हात पाय आणि तोंडात बोळा ठेवलेल्या अवस्थेत सापडला. हा प्रकार धक्कादायक असून त्या तरुणास उपचारासाठी खाजगी रुग्णाला दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती ठीक नसल्याने अद्याप त्याने पोलिसांना संपूर्ण हकीगत सांगितले नाही. याबाबत रात्री उशिरापर्यंत एमआयडीसी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता मात्र या प्रकरणाबाबत एमआयडीसी परिसरात चांगलीच उलट सुलट चर्चा सुरू आहे. जोपर्यंत तो तरुण हकीगत सांगत नाही तोपर्यंत हे एक गूढ असणार आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular