HomeUncategorizedमहायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी... ऑडिओ...

महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी… ऑडिओ क्लिप व्हायरल..

advertisement

अहमदनगर दि.७ एप्रिल
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील चुरशीच्या सामन्यात आता रंगत वाढत चालली असून दोन्ही उमेदवार सध्या अहमदनगर जिल्ह्यासह जे मतदार बाहेर आहेत अशा ठिकाणी जाऊन प्रचार करण्यात आघाडीवर आहेत.

सध्या महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या समर्थकांमध्ये चांगलेच सोशल मीडियावर सुरू आहे. एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेत्यांचे समर्थक सोडत नाहीत.
निवडणुकीचे वातावरण असल्यामुळे सध्या प्रत्येक ठिकाणी निवडणुकीची चर्चा सुरू आहे शहराच्या पान टपरी पासून ते गावातील पारावर बसलेल्या ग्रामस्थांमध्ये सुद्धा कोण निवडून येणार अशी चर्चा सुरू आहे.
अशाच एका चर्चेवरून थेट खासदार सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालून ठार मारेल अशी धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे.

असा आहे व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिप मधील संवाद

पहिला पुरुष –
त्यादिवशी तुम्ही गावात काहीतरी बाईट दिली तुम्ही म्हणाले 60% विखे चालेल असं आम्ही ऐकलं आहे.

दुसरा पुरुष
सगळे बसले होते तेव्हा ते सर आले तेव्हा म्हणले अगोदर चर्चा झाली मी म्हणलो चालू शकतो बुवा

पहिला पुरुष – अहो ऐका ना ..(एका कार्यकर्त्यांचे नाव घेतले ) त्याने मला लगेच फोन केला नाना तीन कोल्हापुरी के टी वेअरची कामे सुरू आहेत कळसवाडीला रस्ता दिलाय नांदूर पठारला रस्ता दिलाय तुम्ही के टी वेअर चे बोलले नाही..(शिवी) विखेंना आम्ही गोळ्या झाडणार आहे नेत्यांना कोणी त्रास दिला तर आम्ही त्याची …(शिवी)… टिंब टिंब मारणार आहोत विखे पन्नास वर्षात कधी आमच्या गावात आला नाही आता टमकी वाजवत आहेत..( शिवी )त्याने सर्व ठिकाणी क्लिप व्हायरल केली ती (एकाचे नाव घेतले आहे ) ऐकली मी नाही तेव्हा ते म्हणाले तुकड्यावरचे आहेत सर्व…..

असे संवाद असलेली जवळपास ही क्लिप साडेचार मिनिटांची असून यामध्ये मोठ्या प्रमाणात शिवीगाळही केलेली आहे. त्यामुळे आता राजकारण चांगलेच तापू लागलेय राजकारण अशाच प्रमाणात खालच्या स्तरावर गेले तर पुढील काळात चांगलीच गरमागरम होऊ शकते. त्यामुळे नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संयम राखणे महत्त्वाचे आहे. अन्यथा यामध्ये सर्वसामान्य नागरिक भरडून जाऊ शकतो.
याप्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झालेला
नाही मात्र ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Most Popular